कोकण

स्वागत थोरात यांना यंदाचा सावली पुरस्कार

CD

26348
...

स्वागत थोरात यांना यंदाचा सावली पुरस्कार
रविवारी वितरण; खास मुलांसाठी रंगणार ‘जंगलगप्पा’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः येथील सावली केअर सेंटरतर्फे दिला जाणारा सावली पुरस्कार यंदा ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया‘ म्हणून गौरव झालेल्या स्वागत थोरात यांना जाहीर झाला आहे. थोरात हे चित्रकार, निसर्ग व वन्य छायाचित्रकार म्हणूनही परिचित आहेत. रविवारी (ता.२४) पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पन्नास हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान, अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेचे प्रा. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. अध्यक्षस्थानी वीणा गोखले असतील.
सावली केअर सेंटर गेल्या वीस वर्षांपासून शारीरिक वा मानसिकरीत्या परावलंबित्व आलेल्या रुग्णांच्या शुश्रुषेच्या कामात कार्यरत आहे. आजपर्यंत संस्थेला साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. सध्या संस्थेत २८० रुग्ण सेवा घेत आहेत. समाजाला दिशा देणाऱ्या‍ सेवाव्रतींची समाजाला ओळख व्हावी, या उद्देशाने सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार वितरण होणार आहे.
स्वागत थोरात यांनी आजअखेर ५२ राष्ट्रीय उद्याने आणि तीनशे वीस अभयारण्यांना भेटी देऊन लाखाहून अधिक छायाचित्रे, तर चारशे तासांहून अधिक व्हिडिओ छायाचित्रण केले आहे. त्यावर आधारित ‘जंगलगप्पा’ हा कार्यक्रमही ते शालेय मुलांसाठी करतात. अंध व्यक्तींसाठी त्यांनी २००८ साली ‘स्पर्शज्ञान’ हे भारतातील पहिले ब्रेल लिपीतील मराठी पाक्षिक सुरू केले. २०१२ पासून ‘रिलायन्स दृष्टी’ हे हिंदी भाषेतील जगातील सर्वात जास्त छापले व वाचले जाणारे ब्रेल पाक्षिक त्यांनी सुरू केले. गेल्या वर्षीपासून ‘रिलायन्स दृष्टी’ची मराठी आवृत्तीही सुरू झाली आहे. ब्रेल लिपी कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक अंध व्यक्तींना त्यांनी ब्रेल साक्षर केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी सांगितले.
...

दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन
शनिवारी (ता.२३) सायंकाळी साडेपाच वाजता शालेय मुलांसाठी थोरात यांचा ‘जंगलगप्पा’ हा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळ्यात सोनाली नवांगुळ त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दोन्ही कार्यक्रम पिराचीवाडी येथील सावली केअर सेंटरमध्ये होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

SCROLL FOR NEXT