कोकण

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

CD

दहावी, बारावी परीक्षेसाठी
२ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

यंदा दहा दिवस आधी परीक्षा; माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः दरवर्षीपेक्षा दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा दहा दिवस आधी आली आहे. या दोन्ही परीक्षांसाठी कोल्हापूर विभागातून आतापर्यंत २ लाख ४७ हजार २६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या परीक्षेची तयारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी-एचएससी बोर्ड) कोल्हापूर विभागाने सुरू केली आहे.
बारावीची प्रात्यक्षिक अथवा तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी, तर लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी आणि १८ मार्चदरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यासाठी आजअखेर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून एकूण २ लाख ४७ हजार २७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात बारावीच्या अर्जांची संख्या १ लाख १६ हजार १८२ आणि दहावीच्या अर्जांची संख्या १ लाख ३० हजार ८४४ इतकी आहे. यातील बारावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्काने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २२ नोव्हेंबर, तर दहावीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
...
दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले
या दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ, लेखनिक, जवळचे परीक्षा केंद्र या सवलती मिळविण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून कोल्हापूर विभागाने प्रस्ताव मागविले आहेत. परिरक्षक, केंद्रसंचालकांची नियुक्ती, केंद्र निश्चितीकरण आणि उत्तरपत्रिका तपासणीसाठी परीक्षक, नियामक नियुक्ती करण्याचे काम सुरू असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
...

‘यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस अलीकडे आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर विभागाची या परीक्षेची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा.
- राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, एसएससी बोर्ड, कोल्हापूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT