कोकण

इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये २७ पासून डोळ्यांच्या पडद्याची तपासणी

CD

इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये
२७ पासून डोळ्यांच्या पडद्याची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : इन्फिगो आय केअर हॉस्पीटलतर्फे येत्या २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान इन्फिगो हॉस्पिटलमध्ये येथे प्रख्यात रेटिनातज्ञ डॉ. प्रसाद कामत डोळयांच्या पडद्याच्या आजारावर तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत.
या हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक रेटिना विभाग आहे. रेटिनातज्ञ डॉ. प्रसाद कामत अतिशय अवघड व गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटल सुरू झाल्यापासून करीत आहेत. आता डॉ. कामत या महिना अखेरीस रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत.
इन्फिगोच्या रेटिना विभाग बी स्कॅन, ग्रीन लेझर, थ्री डी ओसीटी व अत्याधुनिक अर्टली मशीन अशा यंत्रांनी सुसज्ज आहे. सतत चष्माचा नंबर बदलणे, अचानक नजर कमी होणे, पडदा सरकणे किंवा पडद्याला सूज येणे, डायबेटिसमुळे दृष्टी कमी होणे, ४० वर्षांपेक्षा अधिक वय असल्यास, डोळ्यातील प्रेशर वाढणे, डोळ्यापुढे काळे ठिपके दिसणे, वजा ३ पेक्षा अधिक नंबरच चष्मा असल्यास, मुख्य डायबेटीस असणाऱ्यांनी रुग्णालयात डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करून घ्यावी. कारण डायबेटिसमुळे डोळ्यांच्या पडद्यावर दुष्परिणाम होत असतात व ते कायमस्वरूपी असतात. ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पीटलतर्फे केले आहे.
तीन दिवस होणाऱ्या रेटिना तपासणीसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. तपासणीसाठी थोडा वेळ लागत असल्याने सोबत एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. तरी रत्नागिरी, लांजा, देवरुख, संगमेश्वर, राजापूर येथील नागरिकांनी हॉस्पीटलशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटलने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT