कोकण

सावंतवाडीकरांची केसरकरांना भक्कम साथ

CD

27439

सावंतवाडीकरांची केसरकरांना भक्कम साथ

तब्बल ६ हजार मते ः सलग चौथ्यांदा विजयाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः सुंदरवाडी शहर आणि दीपक केसरकर यांचे वेगळे नाते आहे. या शहराने सुसंस्कृत आणि शांत, संयमी असलेल्या केसरकर यांना नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. केसरकर यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये सावंतवाडीकर नेहमी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत. याच जोरावर त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये हॅट्ट्रिक साधण्याचा इतिहास केला होता. आता चौथ्या विजयातही शहरवासीयांची भक्कम साथ त्यांना लाभल्याने सावंतवाडीवासीय केसरकर यांच्याच पाठीशी कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यांना सावंतवाडी शहरातून तब्बल ६ हजार २१७ इतकी मते पडली. त्यांना तब्बल २ हजार ९१० मतांचे मताधिक्य मिळाले.
सावंतवाडी शहराने केसरकर यांना नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. नगरपालिकेतील सत्तास्थानापासून आमदारकीपर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये सावंतवाडीवासीय नेहमीच केसरकर यांच्या सोबत राहिले आहेत. शहरवासीयांच्या जोरावर त्यांनी सावंतवाडीमध्ये १७-० अशी विरोधकांवर मात केली होती. मुळात सावंतवाडी शहर हे शांत, सुसंस्कृत आहे. संस्थानचा इतिहास असलेल्या या शहराने शांत, सुसंस्कृत नेतृत्वालाच नेहमी तारले आहे. केसरकरांकडे हे गुण असल्याने सावंतवाडी शहराचे नेहमीच प्रेम त्यांच्यावर राहिले आहे.
सावंतवाडी नगरपालिकेमध्ये नगरसेवक ते नगराध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर ते २००९ मध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीतही सावंतवाडी शहराने त्यांना साथ देताना मोठे मताधिक्य दिले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत ही स्थिती कायम होती. त्यांच्या प्रत्येक विजयामध्ये सावंतवाडी शहराचा मोठा वाटा राहिला आहे. आता २०२४ च्या चौथ्या विजयातही सावंतवाडी शहराने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मोठे मताधिक्य दिले आहे.
या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी शहरांमध्ये २२ मतदान केंद्रांवर तब्बल १२ हजार २२ इतके मतदान झाले. त्यामध्ये अर्धे अधिक मतदान केसरकर यांच्याच बाजूने झाले. त्यांना शहरातून ६२१७ मते मिळाली, ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांना ३३०७, विशाल परब यांना १६९४ तर अर्चना घारे-परब यांना ५७९ मते मिळाली. केसरकर यांना केवळ सावंतवाडी शहरातून २९१० इतके मताधिक्य मिळाले.
लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी शहरात केसरकर यांना मताधिक्य मिळविता आले नव्हते; परंतु विधानसभेमध्ये सावंतवाडीकर नेहमीच आपल्या सोबत असतात, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. लोकसभेपेक्षा बाराशे अधिक मते त्यांना विधानसभेत मिळाली. या निवडणुकीत विरोधकांनी सावंतवाडीकर केसरकरांना झिडकारतील, असे वातावरण शहरात निर्माण केले होते; परंतु या सर्वांवर मात करत केसरकर यांनी सावंतवाडीकरांची मने जिंकण्याची किमया पुन्हा एकदा साध्य केली. शहरामध्ये दिवाळी असो किंवा गणपती, केसरकर हे नेहमीच सावंतवाडीकरांसोबत दिसून येतात. प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी ते आवर्जून उपस्थित असतात. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना सावंतवाडीकरांनी नेहमीच साथ दिली आहे.
................
तालुक्यातून वीस हजारांचे मताधिक्य
सावंतवाडी शहरासह तालुक्यानेही केसरकर यांनाच साथ दिल्याचे दिसून आले. सावंतवाडी तालुक्यातून केसरकरांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य मिळाले. यामध्ये भाजपचीही त्यांना भक्कम साथ मिळाली. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे महायुतीचे काम केले. एकूणच केसरकर यांना मतदारसंघामध्ये मानणारा वर्ग असल्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा नेहमीच फायदा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT