वैभववाडी शहरात
चोरीचा प्रयत्न
वैभववाडी, ता. २४ ः शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने शनिवारी (ता. २३) चोरीचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही ठिकाणी चोरट्याच्या हाताला काहीही लागले नाही. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामधील दोन घरांमध्ये चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. यापैकी एक घरमालक शनिवारी सकाळीच घर बंद करून मुंबईला गेले होते, तर दुसऱ्या एका घराची खोली बंद होती. या दोन्ही घरांच्या दरवाज्यांचे कुलुप चोरट्याने फोडून घरात प्रवेश केला. एका घरातील कपाटातील सर्व साहित्य विस्कटून टाकले; मात्र त्याला रिकाम्या हातांनी परतावे लागले. दुसऱ्या घरात कसलेही साहित्य नव्हते. कोणतेही साहित्य किंवा रोकड चोरीला न गेल्यामुळे घरमालकांनी पोलिसांत सायकांळी उशिरापर्यंत तक्रार दिली नाही. गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये चोरीचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीही येथे चोरीचे अनेक प्रकार घडल्याने या भागातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, परंतु तरीही चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. संशयित चोरटा त्याच परिसरात राहणारा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.