कोकण

रामराजेचा निकाल १०० टक्के

CD

‘रामराजे’च्या जीएनएमचा
निकाल १०० टक्के

दापोली ः डिस्टींक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोलीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी तृतीय वर्ष जी. एन. एम. या वर्गाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रणिता पाटील ८८ टक्के आणि भाग्यश्री पालशेतकर ८८ टक्के मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आल्या असून, सिद्धेश खामगांवकर ८६ टक्के मिळवून द्वितीय तर सौरभ थोरे ८० टक्के मिळवून तृतीय आला आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिल, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त २००५ ला सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाला एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील १ विद्यार्थी आणि २ विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली असून, प्रथम श्रेणीमध्ये २६ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमाबरोबरच जी. एन. एम. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक मान्यताप्राप्त बीएस्सी नर्सिंग व पी. बी. बी. एस्सी नर्सिंग डिग्री अभ्यासक्रमदेखील सुरू आहे.
---
-rat२८p४१.jpg
२४N२८१९१
- प्रेम बेग

प्रेम बेगला कराटेत
सुवर्णपदक

पावस ः शालेय विभागीय कराटे स्पर्धा नरसोबावाडी शिरोळ (कोल्हापूर) येथे झाल्या. या स्पर्धेत रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग ,सातारा या जिल्ह्यातून ३५० कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात १९ वर्षांखालील ८२ किलो वजन गट प्रकारात प्रेम बेग याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले. धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत त्याची निवड झाल्याने तो रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे‌. ही स्पर्धा वयोगट १४, १७, १९ वर्षांखालील वजन गट प्रकारात घेण्यात आली होती. ए. बी. स्पोर्ट्स अॅकॅडमी रत्नागिरीमधून कराटेचे शिक्षण घेत आहे. त्याला जिल्हाप्रमुख प्रशिक्षक अरूण बेग यांचे मार्गदर्शन लाभले.
__

बालचित्रकार वेदांतचा सन्मान

गुहागर ः ऊर्जा संरक्षणपर राज्यस्तरीय चित्रकला प्रतियोगिता देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा, कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय व भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गुहागर तालुक्यातील काताळे शाळेतील सातवीमधील वेदांत डिंगणकर याची राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत राज्यातून टॉप ५० मध्ये निवड झाली आहे. मुंबई येथे नुकतीच राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ८२८ शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये २१ हजार ८२४ हून अधिक चित्रकार मुलांनी भाग घेतला होता. यामधून राज्यस्तरासाठी टॉप ५० मुलांची निवड करण्यात आली. वेदांतला राष्ट्रीयस्तराचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT