rat२९p५.jpg -
P२४N२८२७९
आरवली : येथील कुंभारखाणी बुद्रुककडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर खडी वर आली आहे.
--------
आरवलीतील सेवा रस्त्यांची चाळण
वाहन चालकांची कसरत ; योग्य सपाटीकरणाचा आभाव
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २९ : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील खडी वर आली आहे. रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे एसटी बसगाड्यांचे चालक या रस्त्यावरून एसटी बसगाड्या नेण्यास नापंसती दाखवत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचांबे परिसरासाठी उड्डाणपूल बांधला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूस कुचांबे, मुरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीला जाण्यासाठी तर पश्चिमेला कोंडीवरे, माखजन, बुरबांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे. उड्डाणपूल व सेवा रस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने सेवा रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत आहेत.
रस्त्याला नाले काढलेले नाहीत. रस्ताही अरूंद आहे. महामार्गावरील आरवली हे माखजन व कुचांबे परिसरातील २५ हून आधिक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथून एक किलोमीटरवर रेल्वेस्थानक असल्याने येथे प्रवासी व वाहनांची सतत वर्दळ असते. इथूनच प्रवासी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीला जाण्यासाठी मध्यवर्ती अधिकृत थांब्यावर बसची वाट पाहतात; मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा एसटी चालक व खासगी वाहनचालक सेवा रस्त्याऐवजी उड्डाणपुलावरून वाहने सुसाट नेतात. यामध्ये प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांना तिष्ठत वाट पाहावी लागते. या सेवांची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
कोट
या रस्त्याबाबत वेळोवेळी स्थानिक आमदार व संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामध्ये जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
- दत्ता परकर, अध्यक्ष, संगमेश्वर तालुका काँग्रेस पक्ष
कोट
ठेकेदाराने महामार्ग पूर्ण होण्यासाठी घाईत काम केले. त्यामुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणे गरजेचे आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
- महेंद्र आंबोरे, रिक्षाचालक आरवली
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.