कोकण

पर्यचकांची स्टंटबाजी धोकादायक

CD

-rat२८p१६.jpg, rat२८p१७.jpg-
२४N२८१०९
दापोली ः किनारपट्टीवर गाड्या पाण्यात बुडल्याने गाड्यांचे नुकसान होते.
--------

पर्यटकांची हुल्लडबाजी, स्टंटबाजी धोकादायक

दापोलीतील किनाऱ्यावर गर्दी ; स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष, दोन गाड्या वाचवण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
दापोली,ता. २९ ः दापोली तालुक्यातील किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. मोठ्या संख्येने येथे पर्यटक येतात; मात्र यातील काही पर्यटकांच्या हुल्लडबाजी, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकवेळी पर्यटकांचा जीव धोक्यात जात आहे. अनेक स्टंट करण्याच्या नादात हे पर्यटक पाण्यात गाड्या घालत असल्याने गाड्यांचेही नुकसान होत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच दोन गाड्या बुडताना ग्रामस्थांनी वाचवल्या आहेत.
मागील पर्यटन हंगामात ७ गाड्या बुडाल्या होत्या. प्रत्येक वेळी स्थानिक ग्रामस्थ धाव घेऊन या गाड्या समुद्रातून बाहेर काढतात; मात्र त्यानंतरही या पर्यटकांची अरेरावी कमी होत नाही. याबाबत ठोस उपाययोजनांची गरज आहे. दापोली तालुक्यातील पर्यटन हंगामाला दिवाळीपासून जोरदार सुरवात झाली आहे. तसेच प्रत्येक शनिवार, रविवारीही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत; मात्र येणाऱ्या पर्यटकांकडून दादागिरी, अरेरावी स्थानिकांना सहन करावी लागते. थंड आल्हाददायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशीपर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोली तालुक्याला पर्यटनदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांतील पर्यटक दरवर्षी येथे येतात. फिरायला आल्यावर या पर्यटकांचा आगाऊपणा स्थानिकांना त्रासदायक ठरतो. समुद्रावर आल्यावर पाण्यात पोहायला जाण्याचा मोह आवरत नाही तसेच मोटार बीचवर नेऊन स्टंट करण्याचा मोहही त्यांना आवरत नाही. ही स्टंटबाजी करताना पुळणीत गाड्या फसतात. या पर्यटकांना पुळणीचा तसेच समुद्राच्या पाण्याचाही अंदाज नसतो. हे सर्व होत असताना स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक त्यांना कल्पना देतात तरीही ग्रामस्थांच्या सूचनांना पर्यटक धूप घालत नाहीत. मग ज्या वेळी गाडी पाण्यात बुडण्याचा प्रसंग येतो तेव्हा मग धावपळ करून ग्रामस्थांना मदतीसाठी हेच पर्यटक बोलावतात. येथील ग्रामस्थ माणुसकीच्या नात्याने जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने गाडी समुद्रातून बाहेर काढतात.
मागील पर्यटन हंगामात ७ पर्यटकांच्या गाड्या बुडता बुडता वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. असे गाड्या बुडण्याचे प्रकार वारंवार होत असूनही अतिउत्साही पर्यटक गाड्या समुद्रावर घेऊन जातात. समुद्राला भरती असेल तर गाड्या पाण्याच्या प्रवाहात खेचल्या जातात. बहुतांश बीचवर समुद्रालगत पार्किंगची व्यवस्था नाही. यावर्षी कर्दे येथे दोन गाड्या बुडता बुडता वाचवण्यात आल्या आहेत. १४ नोव्हेंबरला घडलेल्या घटनेतील मोटारीचे पूर्ण नुकसान झाले कारण, ही गाडी दोन दिवस समुद्रातच बुडालेली होती. त्यानंतर तीन दिवसांनी एक मोठी गाडी पाण्यात बुडाली होती. तिला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.
---
कोट
गाड्या पाण्यात नेणे चुकीचेच आहे. समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज लावणे आपल्यासारख्यांना शक्य नाही. त्यामुळे खोल समुद्राच्या पाण्यात जाणे चुकीचे आहे. जवळपास लाटांवर भिजणे कधीही योग्य. समुद्रावर गाड्या घेऊन जाणे तर खूप चुकीचे आहे.
--राघव पाटील, पुणे
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT