कोकण

मंडणगडमध्ये आमदार कदमांची विजयी मिरवणूक

CD

-rat२९p१४.jpg-
P२४N२८३०८
मंडणगड : शहरातून विजयी आमदार योगेश कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
----------
मंडणगडात आमदार कदमांची मिरवणूक

जंगी स्वागत ; नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः दापोली मतदार संघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मंडणगडमध्ये आलेल्या आमदार योगश कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. तालुकावासीयांनी जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करून एकच जल्लोष केला.
या निमित्ताने शिवसेना, युवासेनेतर्फे स्वागताचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निकालानंतर तातडीने मुंबई येथे जावे लागल्याने मंडणगडवासीयांची शुभेच्छा देण्याची हुकली होती. आमदार योगेश कदम मुंबई येथून तालुक्यात दाखल होताच म्हाप्रळ, शेनाळे, सोवली येथील त्यांच्या घरी नागरिकांनी स्वागत केले. भिंगळोली ते मंडणगड अशी रॅली काढण्यात आली. खालूबाजा, बँजो, डीजे अशा सर्व प्रकारच्या वाद्याचे साथीने शिवसैनिक, युवासैनिक व महायुतीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अनेक जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्या विजयाचा आनंद मिरवणुकीत देहभान विसरून नाचत साजरा केला. मिरवणूक सुरू झाल्यावर नागरिकांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन हस्तांदोलन करत पुष्पगुच्छ व हार घालून अभिनंदन केले. मंडणगड बसस्थानक परिसरात रॅलीचा समारोप झाला.
रॅलीत शिवेसना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी सभापती आदेश केणे, रामदास रेवाळे, अमिता शिंदे, अनंत लाखण, अस्मिता केंद्रे, विनोद जाधव, चेतन सातोपे, भाजपचे तालुकाध्यक्ष अप्पा मोरे, रिपाईंचे दादासाहेब मर्चंडे, आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभिळकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT