कोकण

चिपळूण-पारा घसरल्याने चिपळूण गारठले

CD

-rat२९p१५.jpg -
२४N२८३०९
चिपळूण ः कुंभार्ली घाटात दाट धुक्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे.
-----------

पारा घसरल्याने चिपळूण तालुका गारठला

तापमान १५.५ अंशांवर ; बोचऱ्या थंडीने शेकोट्या पेटल्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : शहरासह ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात चिपळुणातील किमान तापमान पहिल्यांदाच १५.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तापमानातील घट आणि बोचरे वारे यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक ते दोन अंश तापमान कमी जाणवत असल्याने चिपळूण गारठले आहे. सायंकाळनंतर तर दिवसाही शहरात हुडहुडी भरवणाऱ्‍या थंडीची अनुभूती येत आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोटी पेटू लागल्या आहेत.
पहाटे चिपळूण शहरात मॉर्निंग वॉकसाठी फिरणारे नागरिक स्वेटर, कानटोप्या असे उबदार कपडे घालूनच घरातून बाहेर पडत आहेत. शहराच्या बायपास मार्गावरही दाट धुक्यातून थंडीचा सामना करत नागरिक मॉर्निंग वॉक करताना आढळत आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. सात दिवसांपूर्वी १८ अंशांवर असलेले किमान तापमान आता १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. गुरवारी सायंकाळनंतर थंडीची तीव्रता वाढली आहे. काही काळ तर हुडहुडी भरावी अशी थंडी होती. ग्रामीण भागातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. ग्रामीण भागातील किमान तापमान शहराच्या तुलनेत आणखी कमी आहे. यामुळे थंडीचा जोरदार कडाका ग्रामीण भागात जाणवत आहे. विशेषतः पोफळी, कोळकेवाडी, अडरे-अनारी, मिरजोळी भागात थंडीची तीव्रता अधिक आहे.
----
अपघाताचे धोके
बोचऱ्या थंडीमुळे चिपळूण तालुक्यात सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके पडू लागले आहे. अशा धुक्यातून मार्ग काढत वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अशा धुक्यामुळे अपघाताचे धोकेही वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून वाहन चालकांना वाहन चालविताना सावधानता बाळगा अशा सूचना देण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT