‘आयसीएस’मध्ये
एनसीसी डे साजरा
खेड ः येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीस महाविद्यालयाच्या परिसरातील कचरा एकत्रित करण्यात आला व तो पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात आला. या निमित्त मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक वापराला आळा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पीपीटी सादरीकरणातून त्यांनी या विषयाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत घनकचरा व्यवस्थापन किती महत्वाचे असल्याचे सांगितले. प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनीही घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल, या विषयावर माहिती दिली.
---
‘बांद्रा टर्मिनसला
मडगाव थांबा द्या’
खेड ः कोकण रेल्वेमार्गावर सुरू असलेली बांद्रा टर्मिनस मडगाव या गाडीला खेड थांबा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे खेड-दापोली-मंडणगड या तालुक्यातील प्रवासी या सेवेपासून वंचित राहतात. खेड स्थानकाला थांबा मिळण्याची मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या गाडीला खेड थांबा मिळावा, अशी प्रमुख मागणी असून मागणी मान्य न झाल्यास संतप्त प्रवासी रेल्वेमार्गावर उतरून रेलरोको करतील, असा इशारा सागवेकर यांनी दिला आहे.
--
आयसीएसच्या एमएससीचा
९४ टक्के निकाल
खेड ः सहजीवन शिक्षणसंस्था संचलित आयसीएस महाविद्यालयाच्या एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयाचा निकाल ९४.११ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १७ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पार्थ गोखले याने ८.५५ सीजीपीईसह ए श्रेणी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अर्चना झोरेने ८.३६ सीजीपीईसह ए श्रेणी मिळवत द्वितीय क्रमांक तर साहिल कदम व यश कांबळे यांनी ८.१८ सीजीपीईसह ए श्रेणी मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंद भोसले, प्राचार्या डॉ. अनिता आवटी, एमएससी समन्वयक डॉ. सचिन सागर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. के. घुंबरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
---
माखजन स्कूलतर्फे
निसर्गचित्रण स्पर्धा
सावर्डे ः माखजन इंग्लिश स्कूलने (ता. संगमेश्वर) मंगळवारी (ता. ३) अठरा वर्षावरील चित्रकारांसाठी जिल्हास्तरीय निसर्गचित्रण स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सकाळी नऊ ते तीन या वेळेत होईल. अधिक माहितीसाठी संयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशालेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.