-rat२९p११.jpg-
२४N२८३०५
चिपळूण ः रामतीर्थ परिसरातील धोकादायक बनलेल्या इमारतीला गेलेले तडे.
-rat२९p१२.jpg-
२४N२८३०६
धोकादायक झालेली इमारत.
--------------
रामतीर्थ स्मशानभूमीतील इमारतीला गेले तडे
नूतनीकरणाकडे दुर्लक्ष ; जीवितहानीचा धोका, दोन इमारती मोजतायत अखेरच्या घटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एकमेव रामतीर्थ स्मशानभूमीतील इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत तसेच काही भाग खचला आहे. त्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीसह परिसराचे नूतनीकरण करण्याच्या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने ही इमारत धोकादायक झाली असून कधीही पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे शहरातील विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपयांची उधळण होत असताना शहरातील महत्वपूर्ण असलेली स्मशानभूमी विकासापासून वंचित राहणे ही बाब निश्चितच खेदजनक आहे. रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारती आता पूर्णपणे मोडकळीस आल्या असून, त्या अत्यंत धोकादायक अवस्थेतच आहेत. या इमारतींचा काही भाग किंवा पूर्ण इमारत कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत आजूबाजूला फिरणे धोकादायक झाले आहे. स्मशानभूमी आवारातील श्रद्धांजली हॉल व लाकडाची वखार शेवटची घटका मोजत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या विकासाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मशानभूमी परिसराची अवस्था दयनीय झाली असून या ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येत आहे.
---
नूतनीकरणाबाबत पालिकेला पत्र
चिपळूण पालिका हद्दीतील रामतीर्थ स्मशानभूमीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करणे याबाबत वर्षापूर्वी सामाजिक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे पत्र दिले होते. त्याबाबत मुकादम यांनी प्रशासनाला स्मरण देत रामतीर्थ स्मशानभूमी आवारातील मोडकळीस आलेल्या व धोकादायक झालेल्या इमारती काढून टाकाव्यात. येथे नवीन इमारतीसह परिसराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
----
सोयीसुविधांची गरज
रामतीर्थ स्मशानभूमीत विविध बाबींची आवश्यकता आहे. त्यामध्ये श्रद्धांजली हॉल, लाकूडसाठा (लाकडाची वखार), स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीसाठी सर्व आवश्यक सुविधांसह प्रशस्त खोली, शौचालय व बाथरूम, संपूर्ण परिसरात एलईडी दिवे, मुबलक पाणीसाठा व पुरवठा, तलावाच्या बाजूने रेलिंग व नागरिकांना बसण्याची व्यवस्था, उर्वरित मोकळ्या जागेत काँक्रिटीकरण आवश्यक आहे. पालिकेने स्वनिधी अथवा शासकीय निधीतून ही कामे मार्गी लागणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.