28338
वाचक स्पर्धेत अंकिता पाटील प्रथम
सावंतवाडीतील उपक्रम ः तन्वी द्वितीय तर प्रगती तृतीय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व सावंतवाडी श्री श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम अंकिता संतोष पाटील, द्वितीय तन्वी गणेश परब तर तृतीय क्रमांक प्रगती सदानंद परांजपे यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ बक्षिस सृष्टी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. हे स्पर्धक जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
गुरुवारी (ता.२८) सायंकाळी ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम, संचालक भरत गावडे, संचालक अॅड. संतोष सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे. आरती मासिकचे प्रभाकर भागवत. प्रा. जी ए बुवा, रवींद्र भागवत, वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भागवत म्हणाले, ‘‘आपल्याला संस्कार करणारे, प्रश्न निर्माण करणारे साहित्य वाचायला हवेत. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता येते असे साहित्यसंग्रह वाचायला हवेत. प्रश्न निर्माण करणारे साहित्य लेखन साने गुरुजींच्या कथासंग्रहामध्ये आहेत. काही साहित्य लेखन हे फसवणारे असे असते. पण, असेच साहित्य वाचा. पण, त्यापेक्षाही ज्या साहित्य वाचनातून आपल्याला संस्कार मिळतात, असे साहित्य लेखनच वाचायलाच हवे. तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हाच तुम्ही काहीतरी लिहू, बोलू शकता म्हणून तुमचे हात लिहिते व्हायला हवे.
प्रा. बुवा यांनी वाचक स्पर्धेतून तुम्ही जे भाष्य करता ते भाष्य तुम्ही लिखाणातून सादर करा तर विठ्ठल कदम व संचालक भरत गावडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सुप्रिया केसरकर, प्रवीण ठाकूर, दत्तात्रेय कदम, रश्मी सावंत, श्रिया भागवत, प्रकाश माणगावकर आदी उपस्थित होते. विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.