28341
खारेपाटण हायस्कूलतर्फे
२९ डिसेंबरला स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ ः खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलतर्फे २९ डिसेंबरला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, (कै.) प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन द्वीस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम टेक्निकल कॉलेजमधील आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच मोठ्या स्वरूपातील हा स्नेहमेळावा होणार आहे. या मेळाव्याला सर्व आजी-माजी शिक्षक तसेच आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले असून संपूर्ण दिवसभर माजी विद्यार्थ्यांच्या अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने केले जाणार आहे. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.