28342
नवनिर्वाचित आमदार
अनंत नर यांचा सत्कार
तळेरे, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगावचे सुपुत्र अनंत ऊर्फ बाळा नर यांची मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीतून आमदारपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था व श्री कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
श्री. नर यांनी नगरसेवक म्हणून अनेक वर्षे उत्तम सेवा बजावली असून त्यांनी यावेळी प्रथमच आमदारपदाची निवडणूक लढवली होती. भरघोस मताधिक्यांनी ते विजयी झाले. याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. मोरये, नांदगाव विकास मंडळाचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन रेवडेकर, मंडळाचे सरचिटणीस राजेंद्र मोरये व नांदगाव ग्रामस्थ व शिवसेनेचे जोगेश्वरीतील पदाधिकारी सुनिल म्हसकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.