कोकण

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे नाचणे शाळेत कार्यक्रम

CD

-rat२९p२४.jpg-
OP२४N२८३७०
मार्गदर्शन करताना प्रतिभा प्रभुदेसाई. डावीकडून दीपा सावंत, प्रमोद कोनकर, मानस देसाई, माधव हिर्लेकर, चंद्रकांत हळबे, दीपक नागवेकर.
---------

राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श मुलींनी घ्यावा

प्रभुदेसाई ः कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे नाचणे शाळेत कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्यासाठी आपल्या कर्तृत्वाने इतिहासाच्या पानांवर ठसा उमटवला. सामान्य घरात जन्मलेली; पण झाशीची राणी झालेल्या कर्तबगार राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनीही घेतला पाहिजे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षिका आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे आज नाचणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी मुख्याध्यापिका अनुप्रिता आठल्ये, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, सदस्य मानस देसाई, प्रमोद कोनकर, डाएटच्या अधिव्याख्यात्या दीपा सावंत, शिक्षिका शरदिनी मुळ्ये, विनोदिनी कडवईकर, दीपक नागवेकर आदी उपस्थित होते.
प्रभुदेसाई यांनी राणीचा थोडक्यात इतिहास अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने शाळेला अडीच हजार रुपयांची उपयुक्त पुस्तके, राणीच्या फोटोची फ्रेम भेट म्हणून दिली. अध्यक्ष हिर्लेकर यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली.
---
स्पर्धेतील विजेते
वक्तृत्व स्पर्धा मोठा गट- तन्वी धुळप, मयुर चौधरी, तनया घवाळी. लहान गट- आरूषी काजरोळकर, हेतल चौहान, तन्वी गावडे. चित्रकला मोठा गट- आर्यन घाणेकर, तन्वी धुळप, सारा भोसले. लहान गट- हेतल चौहान, आरूषी काजरोळकर, अनन्या पांचाळ. डिक्शनरी स्कील मोठा गट- अन्सार नासीर, पूर्वी साळुंखे, तनया घवाळी. लहान गट- मोहित काजरोळकर, भैरवी चव्हाण, समिना अन्सारी. १०० मीटर धावणे मोठा गट- आर्यन घाणेकर, आयुष आग्रे, दिव्या साळुंखे. लहान गट- आर्यन घेवडे, आरूष भोगले, युविका चौहान. प्रश्नमंजुषा मोठा गट- सोहन लिंगायत, वेदांत टाकळे, पूर्वी साळुंखे. निबंध स्पर्धा लहान गट- आरूषी काजरोळकर, स्वरा सुपल, इशिका भोगले. या विजेत्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

Amboli Monsoon Tourism : पावसाळ्यात आंबोली फिरायचा प्लॅन आहे? वन विभागाची 'निसर्गरम्य सफारी' पुन्हा सुरू; वाचा कधीपासून आणि कसं करायचं बुकिंग!

FDA Pune Satara Action: तुमच्या ताटात पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग'? पुणे साताऱ्यात FDAची कारवाई, धक्कादायक माहिती समोर..

SCROLL FOR NEXT