कोकण

खैर तस्करीचा पैसा दहशतवादी कारवायांसाठी

CD

खैर तस्करीचा पैसा
दहशतवादी कारवायांसाठी?

दोन महिन्यात दोन घटना ; ‘त्या’ व्यवसायिकांकडे बेकायदासाठा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : सावर्डे येथील कात व्यावसायिकांना बेकायदा खैराची विक्री करून त्यातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
स्थानिक पातळीवर बेकायदेशीरित्या कृत्य करून त्यातून मिळणारा पैसा दहशतवादासाठी वापरण्याच्या योजना अमलात आणल्या जात आहेत. खैर तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी उभा केला जात असल्याचा संशय आहे. दोन महिन्यापूर्वी मुंबईतील दहशतवादी पथकाने सावर्डे येथे कारवाई केली होती. त्यानंतर आता नाशिकच्या पथकाने कारवाई केली आहे.
येथील एका बड्या कात व्यवसायिकांकडे खैराचा बेकायदा साठा नाशिकच्या वनविभागाच्या पथकाला सापडला आहे. त्यांनी स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना केली; मात्र चार दिवसानंतरही स्थानिक विभागाच्या पथकाने कोणतीही कारवाई केली नाही. राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नाशिक येथे विनापरवाना खैरतोड करून येथील लाकूड सावर्डेमध्ये आणल्याचा आणि या खरेदी-विक्रीतील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय गुजरात इडीला आहे. त्यामुळे गुजरात इडीच्या आदेशावरून सावर्डे परिसरातील तीन कातभट्ट्यांवर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे तर तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन कात व्यावसायिक अजून पसार असून त्यांच्यावर वनविभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT