-rat२९p२९.jpg-
OP२४N२८३८३
चिपळूण : भोगाळे येथील एसटीच्या जागेत उघड्यावर असा कचरा टाकण्यात आला होता.
------------
एसटीचा कचरा भोगाळेतील उघड्या जागेत
बाळा कदम आक्रमक; प्रशासन धारेवर, नोटिसीनंतर उचलला कचरा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : राज्य परिवहन महामंडळाच्या चिपळूण आगारातील प्लास्टिकचा कचरा भोगाळे येथील मोकळ्या जागेत उघड्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे भोगाळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी या संदर्भात एसटीच्या व्यवस्थापकाला धारेवर धरल्यानंतर भोगाळे येथील उघड्यावर टाकलेला कचरा चिपळूण आगाराने अखेर उचलला आणि धामणवणे येथील चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पात त्याची विल्हेवाट लावली.
चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात अपरांत हॉस्पिटलच्या शेजारी एसटी महामंडळाची जागा आहे. त्या जागेत चिपळूण आगारातील प्लास्टिकचा कचरा ट्रॅक्टरने टाकण्यात आला होता. गुरूवारी सायंकाळपासून येथे चिपळूण आगारातील कचरा टाकला जात होता. या संदर्भात नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या त्यानंतर पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता तेथे माती आणि तुटलेल्या विटा टाकल्या जात होत्या. या ठिकाणी कचरा टाकू नये, अशी सूचना पालिकेने गुरूवारी चिपळूण आगाराला केली होती. त्यानंतरही आज प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या तुटलेल्या बाटल्या आणि इतर कचरा ट्रॅक्टरने टाकण्यात आला. त्यानंतर या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. याची माहिती शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी पालिकेचे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावले. पालिकेचा कचरा प्रकल्प असताना चिपळूण आगाराने उघड्यावर कचरा टाकणे चुकीचे आहे. एकतर चिपळूण पालिकेने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही चिपळूण पालिका आणि एसटी महामंडळावर गुन्हे दाखल करू, असा इशारा बाळा कदम यांनी दिला. त्यानंतर चिपळूण पालिकेने एसटी आगारप्रमुखाला कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बाळा कदम शांत झाले. त्यानंतर एसटी विभागाने भोगाळे येथे टाकलेला कचरा उचलून धामणवणे येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकण्यास सुरवात केली.
---
कोट
प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा भोगाळे येथे टाकू नयेत, अशी सूचना ट्रॅक्टर चालकाला केली होती; परंतु त्याने आम्हाला न सांगता प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा भोगाळेच्या जागेत टाकला. आम्ही त्याला समज दिली आहे. असे पुन्हा होणार नाही.
--दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.