Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Meteorological Department Update: हवामान विभागाकडून महाराष्ट्रात ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यानुसार १० जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather

Maharashtra Weather

ESakal

Updated on

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या संततधार कोसळत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशातच हा पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com