नौदलातर्फे बाईक रॅली
पावस ः भारतीय नौदलाकडून राईड ऑफ मार्कर्स ही बाईक रॅली २ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. शाळा व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांसोबत संवाद साधणे, राष्ट्र उभारणीमधील भारतीय नौदलाची भूमिका आणि जबाबदाऱ्या, करिअरचे संभाव्य पर्याय याबाबत जागरूकता निर्माण करणे याकरिता नौदलाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा प्रवास आठ शहरातून १ हजार ५८० किमी होणार आहे. २ डिसेंबरला मुंबई ते दापोली असा प्रवास करून ३ ला दापोली येथे मुक्काम आहे. ४ ला दापोली ते रत्नागिरी असा प्रवास करून ५ ला रत्नागिरी येथे मुक्काम आहे. ६ ला रत्नागिरी ते गोवा असा रॅलीचा मार्ग आहे. भारतीय नौदलातील महिला अधिकारी व अग्नीवीर यांच्यासह १८ मोटरसायकल चालक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती ध्वज अधिकारी कमान अभिषेक कारभारी यांनी दिली.
------
ध्वजदिन निधी संकलन
१०पासून होणार सुरू
पावस ः सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ व शौर्यपदकधारक तथा वीर नारी सत्कार समारंभ १० डिसेंबरला सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक पत्नी, पाल्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.