कोकण

सौंदळमध्ये रानगव्याचा विहिरीत पडून मृत्यू

CD

-rat२९p३६.jpg
28405
राजापूर : विहिरीत पडलेल्या गव्याची पाहणी करताना वनविभागाचे अधिकारी.

सौंदळमध्ये विहिरीत
पडून गव्याचा मृत्यू
राजापूर, ता. २९ : तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळमधील खालचीवाडी येथील ग्रामस्थ माधव हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळी, पोफळीच्या बागेत असलेल्या विहिरीत गवा मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला विहिरीबाहेर काढून त्या मृत गव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. हा नर गवा दीडवर्षांचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
कोंड्येतर्फ सौंदळ येथील हर्डीकर यांनी राजापूरच्या वनविभागाला गवा विहिरीमध्ये मृतावस्थेमध्ये आढळून आल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. सदरच्या घटनेची माहिती येथील वनविभागाने परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी यांना कळवून त्यांच्या समवेत राजापूरचे वनपाल जयराम बानदाने, वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, नीतेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या टीमने घटनास्थळाची पाहणी केली असता हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागेत असलेल्या विहिरीत गावा पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी विहिरीत रस्सी टाकून जेसीबीच्या साहाय्याने मृतावस्थेत असलेल्या गव्याला विहिरीच्या बाहेर काढले. या गव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी यांनी केली. पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे यांनी सदरच्या रानगव्याचे शवविच्छेदन केले असता विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती वनविभागाने दिली. त्यानंतर विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्याला लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT