कोकण

-मंजूर कामांचे श्रेय लाटण्यासाठी धडपड

CD

मंजूर कामांचे श्रेय लाटण्यासाठी धडपड

बाबू म्हाप ः शिवसेना-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : आमदार उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीबाबत काहींच्या विरोधात केलेली वक्तव्ये चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या कामांबाबत मित्रपक्षातील काहीजन आंदोलन करत आहेत. त्यांनी टाकीवरून उडी मारू नये, ते आम्हाला हवे आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत जाणीवपूर्वक नाराजी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. या कामांचे श्रेय लाटण्यासाठीच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची धडपड सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप आणि शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी केला.
सावंत यांच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत शहरप्रमुख बंदरकर म्हणाले, शहरातील सरकारनगर येथील गळक्या टाकीचे काम करून घेण्यासाठी आमचे स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. तीन महिन्यांपूर्वीच हे काम मंजूर झाले आहे. सामंत यांनी त्याला ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. आचारसंहितेमुळे हे काम राहिले होते. दोन दिवसात ते सुरू होईल; परंतु याबाबत मित्रपक्षाने आमच्याशी चर्चा करायला हवी होती. मंजूर झालेल्या कामाबाबत ते टाकीवर चढून का आंदोलन करणार आहेत, हे त्यांनाच विचारायला हवे.
म्हाप म्हणाले, कुवारबाव येथील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या विषयदेखील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक चालवला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या रस्त्याचे काही काम करून घेण्यात आले. उर्वरित काम आचारसंहितेमुळे थांबले होते. तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी हा विषय उचलून धरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी वाद! ३५०० कोटी रोकड, सोन्या-चांदीचे रेकॉर्ड गायब; ६ वर्षांपूर्वी व्यवस्थापनाबाबत व्यक्त केलेली चिंता, ४ गंभीर त्रुटी

Ahilyanagar Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ‘नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप’; अहिल्यानगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Nilesh Lanke: सात-बारा कोरा करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा, नीलेश लंके यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयावर एल्गार

Koyna Dam History : कोयना धरणाचे पाणी ओसरले अन् उघड झाला पाण्याखाली लपलेला इतिहास; भग्न अवशेषांमधून समोर आलं जुनं वैभव, 74 वर्षांनंतर काय पाहायला मिळालं?

Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT