कोकण

बांग्लादेशीयांविरुद्ध जिल्ह्यात सर्च ऑपरेशन

CD

बांग्लादेशीयांविरुद्ध जिल्ह्यात शोध मोहीम

धनंजय कुलकर्णी; अन्य भागांतही असण्याचा संशय

रत्नागिरी, ता. २९ : जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशीय नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी हे नागरिक असण्याचा संशय आहे. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरीतील नाखरे येथे बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक भागात बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध शोध मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात घुसलेल्या बांग्लादेशींवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे एका आंबा व्यापाऱ्याकडे बांग्लादेशी घुसखोर कामाला असल्याचे पुढे आले. मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पोलिस कोठडीत व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या बांग्लादेशीय नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. एका एजंटद्वारे जिल्ह्यात दाखल झाल्याचे तपासात पुढे आले होते.
जिल्ह्यातील अन्य भागांतही बांग्लादेशी घुसखोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बांग्लादेशी घुसखोरमुक्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करण्याची तयारी केली आहे. या पथकाद्वारे संशयास्पद भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. ज्या भागात यापूर्वीच बांग्लादेशींचे वास्तव्य होते त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ज्या नागरिकांना बांग्लादेशी घुसखोरांसंदर्भात माहिती आहे त्यांनी ती जिल्हा पोलिसांना द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
-------
चौकट...
बांग्लादेशात धाडणार
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे १३ बांग्लादेशीय चिरेखाणीवर काम करताना आढळून आले. या बांग्लादेशीयांबाबत शासनाला माहिती दिली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करून त्यांना बांग्लादेशात परत पाठविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Rain Nakshatra : यंदा पाऊस कसा पडणार? नक्षत्र अन् वाहनांवरून मिळाले मोठे संकेत; जाणून घ्या पावसाबाबत काय म्हणते शास्त्र

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

SCROLL FOR NEXT