कोकण

केळकर हायस्कूलमध्ये महात्मा फुलेंना वंदन

CD

केळकर हायस्कूलमध्ये
महात्मा फुलेंना वंदन
देवगड ः वाडा (ता. देवगड) येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूलच्या भिडे सभागृहात पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. फुले यांनी लोकजागृतीचे काम केले, असे मुख्याध्यापक सुनील घस्ती यांनी यावेळी सांगितले.
मंचावर सहायक शिक्षक सिद्राम पाटील उपस्थित होते. फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनी सानवी वारीक हिने प्रास्ताविक केले. विद्यार्थी भाषणांमध्ये प्रचिती तावडे, रिद्धी घाडी, आर्या पुजारे, ईशा मुळम, वैष्णवी वारीक, सेजल घाडी आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. घस्ती यांनी, महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना फुले यांनी समाजात सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रीशिक्षण, बालविवाह प्रतिबंध, सती प्रथेला विरोध, शोषित घटकांना समतेचे स्थान मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी केली. शिक्षण चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली. त्यांनी लोकजागृती करण्याचे काम केले. या कार्यात सावित्रीबाई फुले यांचीही त्यांना साथ लाभल्याचे सांगितले. सुत्रसंचालन चिन्मया थोटम हिने केले. आभार शमिका पुजारे हिने मानले. या कार्यक्रमाचे आयोजन नववी ब च्या वर्गाने केले होते.
--------------------
गोळवण ग्रामस्थांचा
८ डिसेंबरला मेळावा
मालवण : गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित पहिला मेळावा मुलुंड मुंबई येथे ८ डिसेंबरला सायंकाळी २ ते ८ या वेळेत होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. गोळवण गावातील सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. गोळवणचे ज्येष्ठ आणि नवतरुण पखवाज वादक, बुवा यांचे सोलो सादरीकरण, चक्रीभजन आणि गीत गायन कार्यक्रम होणार आहेत. लहान मुलांचे विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स असणार आहेत. सोबत महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा अर्थात खेळ पैठणीचा आणि सर्वांसाठी निःशुल्क लकी ड्रॉ कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती गोळवण ग्रामस्थ विश्वस्त, मुंबई अध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी दिली.
---------------------
आजगावत ११ डिसेंबरला
‘गीताई पठण’ स्पर्धा
सावंतवाडी ः आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या विद्यमाने ‘गीता जयंती’ निमित्त बुधवार, ११ डिसेंबरला दुपारी ३ वाजता मराठी ग्रंथालय आजगावच्या सभागृहात दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आजगाव केंद्रातील मुलांसाठी ‘गीताई पठण’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी एका गटातून एका शाळेचे ३ स्पर्धक पाठवावेत. गट क्रमांक पहिली ते ३ री ते ५ वी गीताई अध्याय १५ वा श्लोक, गट क्रमांक २ ६ वी ते ८ वी गीताई अध्याय १२ वा श्लोक, १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे मराठी ग्रंथालय, आजगाव येथे आणून द्यावीत, असे आवाहन आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष अण्णा ऊर्फ रामचंद्र झांट्ये आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांनी केले आहे.
----------------
ग्रंथालय अध्यक्षपदी
चंद्रकांत सावंत
ओटवणे ः माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मुकुंद सावंत यांची फेरनिवड संस्थेच्या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षा मीरा दिनेश कासार, कार्यवाह सतीश गणेश मालशे, सदस्या रेश्मा रविकांत सावंत, शीतल रामचंद्र सावंत, संजय कानसे, मिलिंद कासार. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत होते. यावेळी माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातून दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या मधुरा मिलिंद सावंत, सोमदत्त प्रमोद भोगण, लोकेश रामदास भोगण यांचा पारितोषिक देऊन सत्कार
करण्यात आला. शीतल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मीरा कासार यांनी आभार मानले.
---
आरवली जागबाईचा
उद्या जत्रोत्सव
वेंगुर्ले ः तालुक्यातील आरवली गावातील श्री देवी जागबाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव १ डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त केळी ठेवणे, ओटी भरणे, रात्री आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT