निवृत्त पोलिस हत्याप्रकरणी
संशयिताला पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२९ : निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विनोद आचरेकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित सिद्धीविनायक पेडणेकर याला कणकवली न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धीविनायक पेडणेकर याने २७ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास विनोद आचरेकर यांची डोक्यावर कुदळ मारून हत्या केली होती. त्यानंतर गुरुवारी (ता.२८) सकाळीच संशयित पेडणेकर याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर केले असता खुनाच्या अधिक तपासासाठी ३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आपल्यावर जबरदस्ती केल्याने आचरेकर यांच्या डोक्यात कुदळ मारल्याची कबूली संशयित पेडणेकर याने दिली आहे. तरीही या खुनामागे मालमत्ता वाद, वैयक्तिक भांडण किंवा अन्य काही कारणे आहेत का? या दृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.