कोकण

निलेश राणे अभिनंदन विशेष

CD

डोक - लोकप्रिय आमदार निलेश राणे अभिनंदन विशेष

29048
टीपः swt३२१.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - निलेश राणेंचा हा फोटो प्राधान्याने वापरणे.


टीपः swt३१०.jpg व swt३२०.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - निलेश राणे
टीपः swt३११.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः विजयी मिरवणुकीत सहभागी आमदार निलेश राणे.
टीपः swt३१२.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः खासदार नारायण राणे यांची प्रतिमा उंचावून आनंद साजरा करताना आमदार निलेश राणे.
टीपः swt३१३.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः जनतेचे मतदार यांचे आभार मानताना आमदार निलेश राणे.
टीपः swt३१४.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः रणजित देसाई यांच्यासमवेत आमदार निलेश राणे.
टीपः swt३१५.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन करताना दत्ता सामंत, संजय आंग्रे, अशोक सावंत व कार्यकर्ते.
टीपः swt३१६.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडून विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र स्विकारताना निलेश राणे. बाजूला दत्ता सामंत
टीपः swt३१७.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः विजयी मिरवणुकीत सहभागी जनसमुदाय, पदाधिकारी व कार्यकर्ते.
टीपः swt३१८.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः हजारोंच्या साक्षीने निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ ऑक्टोबरला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी बाजूला खासदार नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे.
टीपः swt३१९.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुडाळ ः एका धार्मिक कार्यक्रमात पालखीमध्ये सहभागी आमदार निलेश राणे. बाजूला महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर.


विकासाचे नवे पर्व

लीड
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावर तब्बल दहा वर्षांनंतर महायुतीने शिवसेनेने नीलेश राणे यांच्या रुपाने विजय संपादन केल्यानंतर आता त्यांनी कुडाळ-मालवणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या गाठीभेटी, त्यांना अभिप्रेत असणारा विकास तसेच येथील एमआयडीसीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे. एमबीए शैक्षणिक संकुलासह येथील खेळाडूंसाठी भरीव योगदान, येथील तरुण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक वाटचाल कशी करेल, या दृष्टीने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहेत. येत्या पाच वर्षांत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचे त्यांचे स्वप्न आहे. येथे विकासाचे नवे पर्व साकारण्याच्या दिशेने श्री. राणे यांनी एकेक पाऊल भक्कमपणे टाकायला सुरुवात केली आहे.
..

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात एक लाख ५७ हजार ३२३ मतदारांनी मतदान करून निलेश राणे यांना ८१७६ मतांनी विजयी केले. २००९ मध्ये खासदार असताना त्यांनी आपल्या रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाचा विकास केला. महायुतीची अडीच वर्षे सत्ता असताना त्यांना अनेक पदे मिळत होती. पण, ते पदांपासून दूर राहिले. या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. ग्रामीण भागात जाऊन त्यांनी प्रत्येक मतदारांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेचे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महत्त्वाचे प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी टाकलेली ही पावले त्यांना या निवडणुकीत फलश्रुतीदायक ठरली. ज्या मतदारसंघात त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांचा पराभव झाला त्याच मतदारसंघावर त्यांनी विजयश्री खेचत आणत अतिशय शांततेच्या मार्गाने मतदारांच्या आशीर्वादाने ते विधानसभेत पोचले.
निवडणुकीच्या निमित्ताने विविध नेते तसेच मंत्री उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतात. मात्र, २०२४ च्या या निवडणुकीत या सर्वांना फाटा देत श्री. राणे व त्यांच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोणतीही जाहीर प्रचार सभा घेतली नाही कि उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केले नाही. ग्रामीण भागात छोट्या छोट्या सभा घेण्यात आल्या आणि त्या सभांवरच श्री. राणे निवडून आले. प्रचार कालावधीत त्यांनी अतिशय शांततेत, कोणावरही कोणतीही टीका न करता ही निवडणूक लढवली. यातच ते खऱ्या अर्थाने जनतेचे मतदारांचे विश्वासाचे आमदार म्हणून निवडून आले. विजय झाल्यानंतर त्यांनी माझ्या विजयाचे सर्व शिलेदार महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मतदारसंघातील जनता असल्याचे सांगितले. तसेच वैभव नाईक यांनी चांगली फाईट दिली. मी सुद्धा दोनवेळा खासदारकीला पराभूत झालो आहे. मात्र, नाईक यांनी जी फाईट दिली त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, हे सांगायला ते विसरले नाहीत. विजयी झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली, त्या मिरवणुकीतही त्यांनी या विजयाचा मी फक्त निमित्त आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, योगदानामुळेच मी विजयी झालेलो आहे. आज मला जो काही मी मतदारसंघात फिरताना तुम्हा सर्वांच्या सहकार्याने कुडाळ मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी जो शब्द दिला आहे, तो मी निश्चितच पाळीन. ज्या-ज्या गावात विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या गावातील माझ्या कार्यकर्त्यांनी ते मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे यावे. ते सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेली दहा वर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या या कुडाळ-मालवण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात साडेसहाशे ते सातशे कोटीचा निधी आणू शकलो. आम्ही मागील अडीच वर्षे शिंदे-फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत फार मदत झाली. विकासाच्या माध्यमातून माणूस जेव्हा कनेक्ट होतो, तेव्हा त्या मतदारसंघाची प्रगती होत असते. ही निवडणूक आम्ही लोकांसाठी विरोधकावर कोणतीही टीका टिप्पणी न करता मला मतदारसंघात जनतेसाठी काम करायचे आहे. विविध प्रकल्प आणायचे आहेत आणि दुर्लक्षित झालेल्या कुडाळ-मालवणला महाराष्ट्र राज्याच्या टॉप फाईव्हमध्ये न्यायचे आहे. येत्या अडीच वर्षात स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या जमिनीत एमबीए शैक्षणिक संकुलसह विविध प्रकल्प साकारायचे असल्याचे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रच्या विधिमंडळ बजेटमध्ये या मतदारसंघाचा उल्लेखही नाही. विविध प्रश्न उघड्यावर पडलेले आहेत. आम्ही विकासाचा प्लान करताना अर्थसंकल्प जिल्हा नियोजनमध्ये किती निधी मिळू शकतो, याचे नियोजन केले आहे.नवीन प्लान तयार अशून त्यामध्ये जोड रस्ता, घाट रस्ते, बीज्रेस असतील. कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्याचे मेंटेनन्स जपणे महत्त्वाचे आहे. या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. काही ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस नाहीत.
प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण भागाचा कणा असताना या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. भरतीही झालेली नाही. सिव्हीलची अवस्था दयनीय आहे. शासकीय मेडिकलला सिव्हीलचा स्टाफ वापरला जातो, तो सुद्धा कमी प्रमाणात आहे. गरीब माणसाला खाजगी हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा मी सक्षम करणार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वांगीण विकास करताना या मतदारसंघात विविध उपक्रम राबवतानाच एमबीए इन्स्टिट्यूट, शैक्षणिकदृष्ट्या इन्स्टिट्यूट हे स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या जमिनीवर उभ्या करण्याचा माझा मानस आहे. हा प्रकल्प येत्या अडीच वर्षात पूर्ण नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात स्पोर्ट्समन तयार झाले पाहिजेत. राज्यात ऑलिंपिकसाठी येथील खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल, या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे.
जिल्ह्यातील बाकीचे तालुके पाच पाचशे कोटींचा निधी मिळवत असताना हा मतदारसंघ मात्र शंभर कोटी किंवा त्याच्या आतच निधी आणत राहिला याचे दुःख आहे. जिल्ह्याचे ठिकाण असूनही साधे स्पोर्ट्स कॉप्लेक्स उभारत आलेले नाही. रस्त्यांच्या अवस्थेबद्दल बोलून काहीच उपयोग नाही. उद्योग नाहीत, इथल्या तरुणाला रोजगारासाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ही सर्व स्थिती बघवत नव्हती आणि म्हणून माजी मुख्यमंत्री विदयमान खासदार नारायण राणे यांचे नाव जोडला गेलेला हा मतदारसंघ २१ व्या शतकातला मतदारसंघ बनवण्यासाठी माझे सर्व प्रयत्न होते, आहेत आणि राहतील. गेली कित्येक वर्षे एमआयडीसी बंद अवस्थेत आहे. अनेक उद्योगधंदे होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न गरजेचे होते. या डोंगराळ पट्ट्यात असणाऱ्या एमआयडीसीसाठी विशेष बाब म्हणून मंत्रीमार्फत प्रस्ताव देणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही. रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझ्या पातळीवर नियोजनपूर्वक निश्चितच प्रयत्न करणार आहे. आपल्या ग्रामीण भागातील भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लाडकी बहीण योजना कार्यन्वित केली. आम्ही इथपर्यंत न थांबता ही योजना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आमच्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केला जाईल. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात जे काही करता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचा निश्चितच प्रयत्न राहील.
----------------------
चौकट
रस्ते, पूलांचे प्रश्न मार्गी
ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांना प्राधान्य देत जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील १५० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांना निधी उपलब्ध करून देत रस्ते खडेमुक्त केले. दळणवळणात महत्वाची भूमिका असलेल्या इतर जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गांना निधी देत दर्जेदार विकासकामे करत हे महत्वाचे रस्ते खड्डेमुक्त केले. दोन वर्षात मुख्यमंत्री सडक योजना टप्पा-२ अंतर्गत कुडाळमधील ११ तर मालवणमधील ९ रस्ते असे मिळून एकूण ६५ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर करून घेत त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कुडाळ-मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या अनेक मोठ्या उंच पातळीच्या पुलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. अणाव, आंबेरी, भडगाव पूल पूर्ण करून घेतले. कित्येक वर्षे रखडलेला वराड-सोनवडे पूल आता अंतिम टप्प्यात आहे. नवीन मोठ्या पुलांमध्ये बाव सुकळवाड, किर्लोस, बुधवळे मळेशेत पूल ही नव्याने मंजूर झालेली विकासकामे असून कडावल-वर्दे, नानेली-घावनळे हे मोठे पूल मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत आणि आता नव्याने बनणाऱ्या महायुती शासनाच्या काळात ही कामे मंजूर करून ही कामे पूर्ण करण्याची माझी धडपड राहील.
---
कोट
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहता कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे कोकणात शिवसेना संघटना वाढत असतानाच आज युवा नेतृत्व कोकणचा बुलंद आवाज आमदार निलेश राणे हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड मताने विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री जेष्ठ नेते दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आता सिंधुदुर्गसह कोकणचा सर्वांगिण विकास अधिक गतीने होणार आहे. केंद्रात व राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे निश्चितच दोन्ही सरकारच्या माध्यमातून कोकणचा पर्यायाने सिंधुदुर्गचा विकास अभिप्रेत आहे. श्री. राणे शिंदे शिवसेना अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणार असून पुन्हा एकदा कोकणात भगव्याचा झंझावात घुमणार आहे.
- संजय आंग्रे, उपनेते, शिंदे शिवसेना
---
कोट
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ ''टॉप फाईव्ह''मध्ये आदर्श होण्यासाठी मी निलेश राणे यांना शुभेच्छा देतो. ज्या प्रतीक्षेत गेली दहा वर्षे आपण होतो ती प्रतीक्षा राणे यांच्या विजयाने संपली आहे. माझ्या जीवनातील हा आतापर्यंतचा आनंदाचा क्षण आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी या मतदारसंघाला विकासामध्ये एका उंचीवर ठेवला होता. तोच मतदारसंघ आता आमदार राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.
- दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना
---
पुरवणी संकलनः अजय सावंत, कुडाळ
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT