- rat३p१६.jpg-
P२४N२९०६३
रत्नागिरी ः मिरजोळे येथे पानाचे विडे भरून देवदिवाळी साजरी करण्यात आली.
घराघरात विडे भरून देवदिवाळी साजरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः कोकणात नरक चतुर्थशीपेक्षा त्यानंतर २१ दिवसांनी येणाऱ्या देवदिवाळीच्या सणाला महत्व दिले जाते. या निमित्ताने कृषीप्रधान सम्राट बळीराजाचे स्मरण कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात केले जाते. सोमवारी (ता. २) देवदिवाळी दिवशी देवाला पानाचे विडे ठेवण्याची परंपरा उत्साहात साजरी करण्यात आली.
केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्याप्रमाणे कोकणात थेट बळीच्या राज्याची मूर्त संकल्पना यावी, अशी अपेक्षा देवदिवाळी दिवशी येथील शेतकरी आपल्या घरात गादीवर विड्यांची मांडणी करून करतात. सोमवारी साजरी झालेल्या या देवदिवाळीला प्रत्येक घरात विडे भरण्यात आले. ‘इडा-पीडा टळो..बळीचे राज्य येवो,'' अशी आर्त साद शेतकरीवर्गातून घालण्यात आली. हा कार्यक्रम म्हणजेच बळीराजाच्या राज्यस्थापनेचा राज्याभिषेकच. हे विडे सामुदायिकरित्या ग्रामस्थांनी भरून साजरा करण्यात आला. त्या वेळी गादीवर मांडणी केलेले विडे देव, वडील-थोर, गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामदेवतेच्या मंदिरात जमून ग्रामस्थांनी सामूदायिकरित्या विडे भरले. गेली कित्येक वर्षे ही परंपरा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.