कोकण

ढगाळ वातावरणाने हापूसवर तुडतुड्याचे संकट

CD

- rat३p२८.jpg-
P२४N२९०८३
हापूस कलमांना आलेला मोहोर.
--------

हापूसचा हंगाम दीड महिन्यांनी लांबला

वातावरण बदलाचा परिणाम; जिल्ह्यात ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हे वातावरण तुडतुडा, बुरशीजन्य रोग, करपा आणि शेंडा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वेगाने होण्यास पोषक आहे. काही ठिकाणी तुडतुडा मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीलाच औषध फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हापूसचा हंगाम दीड महिने लांबला असून, अधिक उत्पन्न देणाऱ्या पहिल्या टप्प्यात बागायतदारांची मोठी निराशा होणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची प्रक्रिया सर्वत्र सुरू होते; मात्र जिल्ह्यात अजूनही अनेक झाडांना मोहोर आलेला नाही. परतीचा पाऊस लांबल्यामुळे बहुसंख्य झाडांना पालवी फुटलेली होती. जून असलेल्या झाडांचा टक्का कमी होता. पाऊस पडत राहिल्यामुळे ऑक्टोबर हीटचा तेवढा प्रभाव जाणवलेला नाही. हापूस कलमांच्या मुळात पाणी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पालवी दिसू लागली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतरही थंडीचा हंगाम लांबला. मागील आठवड्यात अचानक अपेक्षेपेक्षा किमान तापमान खाली घसलेले होते. १० ते १२ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली नोंद झाली होती. दापोलीत ८.८ अंशावर पारा आल्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झालेला आहे. त्यामुळे किमान तापमान २२ ते २४ अंशावर पोचलेले आहे. गेले ३ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका हापूसला बसला आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे हापूसच्या ज्या झाडांना पालवी आलेली नव्हती त्यांनाही पालवी फुटण्याची भीती आहे. तसे झाले तर मे अखेरीस येणाऱ्या आंब्याचे प्रमाण अधिक राहील, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे यंदा हापूसचा हंगाम दीड महिने लांबणार आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आला होता तसेच दरही चांगला मिळाला होता. यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही. मार्च महिन्याच्या सुरवातीला बाजारात जाणाऱ्या आंब्यांचे उत्पादनच कमी राहणार आहे. त्यामुळे बागायतदारांचे गणित बिघडणार आहे.
---
मलावी आंब्याचे वाशीत आगमन
साऊथ आफ्रिकेमधील मलावी आंब्याचे वाशी बाजारात आगमन झाले आहे. हापूससारखा दिसणारा हा आंबा चवीलाही चांगला असल्यामुळे मुंबईतील ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. हापूस आंबा येण्यापूर्वी मलावीला चांगला दर मिळत आहे.
---
कोट १
ढगाळ वातावरणामुळे पालवी आणि मोहोरवार कीडींचा प्रादुर्भाव आहे. औषध फवारणी केली नसल्यामुळे मोठा फटका बसू शकतो. पुढील पंधरा दिवसात काय स्थिती राहील, यावर हंगामाचे चित्र अवलंबून आहे.
- राजन कदम, आंबा बागायतदार
---
कोट २
तामिळनाडूतील चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी झाला असून, हवेतील उष्मा वाढलेला आहे. त्यामुळे तुडतुड्यासह बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण आहे तसेच लहान कलमांवर शेंडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होईल. वातावरणातील बदल हापूसवर परिणामकारक ठरणार आहेत.
- किरण मालशे, संशोधक, भाट्ये नारळ संशोधन केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT