rat3p25.jpg -
N29120
गुहागर : अडूर येथील खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेत्या रिद्धी रहाटेंना गौरवताना मान्यवर.
----------
अडूरमधील पैठणी
रिद्धी रहाटेंनी जिंकली
गुहागर, ता. ३ : गुहागर तालुका तेली समाजसेवा संघातर्फे अडूर येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अडूर तेली समाज ज्ञातीबांधव यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे यंदाचे २५ वे वर्ष होते. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेत एकूण ५५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उखाणे, संगीत खुर्ची, चेंडू फेकणे, फुगे फुगवून फोडणे, ग्लासचे मनोरे करणे, बिस्किट खाणे अशा वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढवणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् निवेदन व प्रेषकांचा उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. यामध्ये रिद्धी रहाटे (गुहागर) विजेत्या ठरल्या. त्यांना पैठणी देण्यात आली. द्वितीय क्रमांक प्रांजल पवार (वरवेली) आणि तृतीय क्रमांक वैशाली रहाटे (वेळंब) यांना मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.