कोकण

श्री देव खवणेश्वर मंदिरात रविवारपासून कार्यक्रम

CD

29114

श्री देव खवणेश्वर मंदिरात
रविवारपासून कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः श्री देव खवणेश्वराच्या २१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री देव खणेश्वर मंदिर खवणे येथे ८ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त रविवारी (ता.८) सकाळी ८ वाजता अभिषेक आणि पूजन, सायंकाळी ७ वाजता खवणेश्वर प्रासादिक भजन मंडळ घाडीवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत आणि स्वप्नील मेस्त्री यांचा डबलबारीचा जंगी सामना होणार आहे. ९ ला सकाळी ८ वाजता अभिषेक व पूजन, सायंकाळी ६.३० वाजता भजन, रात्री ८.३० वाजता शाळेतील मुलांचे कार्यक्रम आणि गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा. १० ला सकाळी ८ वाजता लघुरूद्र व पूजन, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण पूजा व महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ८ ग्रामस्थांच्या व इतर भजन मंडळांचा भजन कार्यक्रम, रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. पहाटे ४ वाजता श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, पागेरेवाडी खवणे यांची काकड आरती होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव खवणेश्वर युवक मित्रमंडळ व खवणेवासीयांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT