सिंधुदुर्गनगरीत ग्राहक तक्रार
आयोगातर्फे ‘मध्यस्थी कक्ष’
पाच प्रशिक्षित कार्यरत, लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात ‘मध्यस्थ कक्षाची’ स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सद्यस्थितीत एकूण पाच प्रशिक्षित मध्यस्थ कार्यरत आहेत. तक्रारदार व विरुद्ध पक्ष या दोघांच्यात सामंजस्याने तडजोड घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम या मध्यस्थांमार्फत करण्यात येते. गुंतागुंतीची व क्लिष्ट स्वरुपाची प्रकरणे या मध्यस्थांमार्फत अतिशय सफाईदारपणे सोडविली जातात. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग प्रबंधक यांनी केले आहे.
जिल्हा ग्राहक आयोगामध्ये एका तक्रारदाराने अर्ज दाखल केला होता. तक्रारदाराने बिल्डरकडील अपार्टमेंटमध्ये सदनिका बुक केली होती. त्यासाठी त्यांनी बिल्डरला रक्कमही अदा केली होती. परंतु, बिल्डरने तक्रारदाराला साठेखत पूर्ण करुन दिलेले नव्हते. सदनिकेचा ताबाही दिलेला नव्हता. त्यांची रक्कमही परत केली नव्हती. त्यामुळे तक्रारदारने या जिल्हा आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण जिल्हा आयोगाने सिंधुदुर्गातीज्येष्ठ व नामांकीत विधिज्ञ एस. एन. भणगे यांच्याकडे मध्यस्थीसाठी सोपविले होते. श्री. भणगे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा आयोगाकडील मध्यस्थामार्फत निकाली होणारे पहिलेच प्रकरण आहे. तक्रारदार आणि बिल्डर यांचे परस्पर समजुतीने आणि संमतीने तडजोडनामा तयार करण्यात आला. तक्रारदाराला त्याची रक्कम बिल्डरकडून परत मिळाली. अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत दोन्ही पक्षकारांना न्याय मिळाला. त्याबाबत संबंधित पक्षकार व श्री. भणगे यांचा जिल्हा आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती मलुष्टे व सदस्य योगेश खाडिलकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
--------------------
कोट
जिल्हा आयोगाकडील प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनीही आपल्या प्रकरणामध्ये मध्यस्थाची नेमणूक करुन आपली प्रकरणे लवकरात लवकर निकाली होण्यासाठी प्रयत्न करावेत.
- जिल्हा आयोग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.