कोकण

दुचाकी-डंपरच्या धडकेत दोडामार्गात दांपत्य गंभीर

CD

29340

दुचाकी-डंपरच्या धडकेत
दोडामार्गात दांपत्य गंभीर
दोडामार्ग, ता. ३ : वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दांपत्य गंभीर जखमी झाले. त्यांना गोवा बांबोळी येथे तातडीने हलविण्यात आले. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. ही घटना आज पहाटे दोडामार्ग शहरात घडली. आज पहाटेच्या सुमारास हे दांपत्य दुचाकीने बाजारपेठेत येत होते. त्याचवेळी आयीच्या दिशेने वाळू घेऊन जाणाऱ्या एका डंपरची धडक दुचाकीला बसली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. जखमी झालेल्या पती-पत्नींना तातडीने गोवा बांबोळी येथे रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. या अपघाताची पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. वाळू वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगात असल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT