कोकण

ओडिशात कंपनीत दुर्घटनेत निवळीतील तरुणाचा मृत्यू

CD

ओडिशात कंपनीत दुर्घटनेत
निवळीतील तरुणाचा मृत्यू?

गॅस गळती ; पाईपलाईनचा व्हॉल्व फुटला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत निवळी (ता. रत्नागिरी) येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे निवळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस गळती होऊन तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते.
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका मोठ्या कंपनीचा एक प्लॉंट ओडिशाला काही वर्षापूर्वी शिफ्ट झाला होता. हा प्लांट शिफ्ट झाल्यानंतर रत्नागिरीत प्लांटमध्ये काम करणारे अनेक कामगार ओडिशाला गेले होते. ते त्याच प्लांटमध्ये काम करत होते. शेकडोंच्या संख्येने येथील स्थानिक कामगार ओडिशाला गेले आहेत. काल ओडिशातील त्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती रत्नागिरीत धडकली. या माहितीनंतर कामगारांच्या कुटुंबांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जो तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत होता. अनेकांचे फोन बंद आल्याने त्यांची भीती अधिकच वाढली. नेमकं काय घडलंय, हे कोणालाच कळत नव्हते; मात्र काहीतरी दुर्घटना झालीय याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती.
या दुर्घटनेबाबत ओडिशातील काही कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्या कामगारांनी माहिती देण्यास नकार दिला. अखेरीस ज्या गावातील तरुणाचा मृत्यू झालाय त्या गावात ओडिशामधून फोन आला आणि सारा प्रकार पुढे आला. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाला स्थायिक झालेल्या त्या प्लांटमध्ये गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या निवळी येथील एका तरुणाच्या अंगावर सारा गॅस आला. त्यामध्ये तो गुदमरला आणि त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. या वृत्ताला काही गावकऱ्यांकडून दुजोरा दिला. आज त्या तरुणाचा मृतदेह रत्नागिरीत आणणार असल्याची माहितीदेखील काही कामगारांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT