वेंगुर्लेतील बोट फिशिंगमध्ये रेड मरीन संघ द्वितीय
भोगवे समुद्रात देशातील पहिली स्पर्धा ; विविध राज्यातील १२ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील भोगवे समुद्रात भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. ‘कोकण एक्स्ट्रिम अँग्लर्स’मार्फत भरवण्यात आलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
कोकणातील किनारपट्टीवर गेली ५ वर्षे ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रात रॉडच्या साहाय्याने मासे पकडण्याची होती. एका बोटीवर ५ स्पर्धक, एक बोट तांडेल (कॅप्टन) आणि आयोजनाकडून एक मार्शल अशी ७ जणांची टीम नेमण्यात आली होती. स्पर्धेत संपूर्ण भारतातून १२ वेगवेगळे संघ सहभागी झाले होते. मुंबई, पुणे, रत्नागिरी, पनवेल, मंगळूर, बेंगलोर, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे स्पर्धक आले होते. स्पर्धकांच्या सेफ्टीबाबत काळजी घेऊनच ही स्पर्धा भरवली गेली. ज्यामध्ये जॅकेट्स, बोया रिंग, मेडिकल सर्व्हिस, बॅकअप् बोट, एक्स्ट्रा इंजिन, प्रत्येक बोटीवर पाणीबॉटल, नाश्ता, कचरा टाकण्यासाठी बिन बॅग या सर्व सोयी आयोजकांकडून पुरवल्या गेल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आर्यवर्त कृषी पर्यटन भोगवे येथे करण्यात आले. कर्नाटक राज्यातून आलेल्या टीम मलबारीझ या संघाने तब्बल १२.५०० किलोचा गोबरा प्रजातीचा मासा पकडून प्रथम तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने द्वितीय, गोव्याच्या लुअर लीजंट या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पराग वाडकर, ओंकार शिवलकर, वैभव कदम, अभिषेक आळेकर, पियुष वाकडे, विनायक बोडणेकर, दत्ता पदुमले, राजा रोगे, महाराजा बोट सर्व्हिस, ऋषी सामंत, रोहित सामंत, राजन मालंडकर, मंगल सामंत, आर्यावर्त कृषी पर्यटन यांनी केले.
------
मलबारीझ संघ प्रथम
बोट फिशिंग स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातील टीम मलबारीझ या संघाने सहभाग नोंदवला होता. या संघाने तब्बल १२.५०० किलोचा गोबरा प्रजातीचा मासा पकडून स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावला. गोव्याच्या लुअर लीजंट या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.