कोकण

कोतवडे हायस्कूलमध्ये डॉ. आंबेडकर यांना आदरांजली

CD

कोतवडे हायस्कूलमध्ये
डॉ. आंबेडकरांना आदरांजली
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) संचलित विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यात आली. या वेळी सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध व्यक्तीमत्त्वाचे पैलू आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनाच्या सवयीबाबत जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे नियोजन मोहिते व लिंगायत यांनी केले. सूत्रसंचालन श्रेया सनगरे हिने केले. अस्मी पांचाळ हिने आभार मानले.
---
ग्रंथपालन वर्ग
प्रवेशप्रक्रिया सुरू
रत्नागिरी ः जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने महाराष्ट्र शासनाचा ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत सुरू राहील. या वर्गास बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष ग्रंथालयीन सेवेत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. या वर्गाचा कालावधी १ जानेवारी ते ३० जून २०२५ असा आहे. दर शनिवार आणि रविवार वर्गाच्या तासिका होतील. सध्या सेवेत असलेल्या ग्रंथालयीन सेवकास आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी या वर्गाचा उपयोग होईल. गृहिणींनाही या वर्गाचा फायदा करून घेता येईल. ग्रंथपालन वर्गास उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांस महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून देण्यात येईल. ग्रंथपालन वर्ग उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास सार्वजनिक ग्रंथालय, महाविद्यालय, माध्यमिक शाळा येथे सेवेची संधी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या वर्गाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वर्ग व्यवस्थापक, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघद्वारा स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
---
प्रा. सुनील भोईर यांना
शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुनील भोईर यांना दिल्ली विधानसभेत आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने प्रमुख पाहुणे दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. भोईर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत यापूर्वी शिखर साहित्य अकादमीने (छत्तीसगड, रायपूर) प्रा. भोईर यांना भारतभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
---
गणपतीपुळेत जल्लोष

रत्नागिरी ः गणपतीपुळे येथे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचा जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित घनवटकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य व शक्ती केंद्रप्रमुख राज देवरूखकर, बूथ प्रमुख सुयोग भिडे, माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. चैतन्य घनवटकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत सदस्य मृणाल घनवटकर, कार्यकर्ते प्रकाश घनवटकर, रेखा जोशी, कोतवडे जिल्हा परिषद गट युवासेना प्रमुख अमित घनवटकर, अमोल गुरव यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रम सुयोग भिडे यांच्या निवासस्थानी ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आला. मोरया चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिठाई वाटप केली. जय श्रीराम म्हणत देशभक्तीपर घोषणा दिल्या.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT