कोकण

जगबुडी नदीकिनारी पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य

CD

जगबुडी नदीकिनारी कचऱ्याचे ढीग
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : खेड पालिका कचरामुक्त शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम गतिमान करत आहे; मात्र दुसरीकडे जगबुडी नदीकिनारी पुन्हा कचरा टाकत पालिकेच्या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रकार नागरिकांकडून सुरू आहे. नजर चुकवून जगबुडी नदीकिनारी वाहनचालकांकडून कचरा टाकला जात आहे. यामुळे पुन्हा कचऱ्याचे ढीग जगबुडी नदीकिनारी निदर्शनास येत आहेत.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकीकडे पालिका कचरामुक्त शहरासाठी झटत आहे; मात्र नागरिकांनी पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत सूचनाफलक लावलेल्या ठिकाणीच कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची तंबी देण्यात आली होती. त्यानंतर नदीकिनारी कचरा टाकणे थांबले होते; मात्र आता पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे नदीकिनारी पुन्हा कचऱ्याचे ढीग आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT