

Salman Ali Agha Runout
Sakal
पाकिस्तानने शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध दुसरा वनडे सामना १२८ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. मात्र हा सामना चर्चेच राहिला तो पाकिस्तानचा अष्टपैलू सलमान अली आघाच्या (Salman Ali Agha) वादग्रस्त धावबादच्या (Runout) निर्णयामुळे.
या सामन्यात सलमान अली आघाने मोहम्मद रिझवान सोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती, पण त्याला ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने धावबाद केले. पण आता यानंतर आयसीसीनेही (ICC) सलमान अली आघाला शिक्षा सुनावली आहे.