कोकण

बहिणी लाडक्या, दिव्यांग मात्र दोडके

CD

बहिणी लाडक्या, दिव्यांग मात्र दोडके

पंधराशे रुपयांसाठी मारतात हेलपाटे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहिना वेळेवर पंधराशे रुपये दिले जात आहेत; मात्र अपंगांना जाहीर केलेले पैसे दोन-दोन महिने मिळत नाहीत. ज्या पैशांवर आमची उपजीविका आहे त्या पंधराशे रुपयांसाठी दिव्यांगांना या योजनेच्या लाभासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याची व्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अपंग कल्याण विभागाचे चिपळूण शहर उपाध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे यांनी मांडली आहे.
या संदर्भात राजेश सुर्वे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मी स्वत: एक दिव्यांग व्यक्ती असून, दिव्यांगांसाठी काम करतो. शासन आम्हा दिव्यांगांना मासिक पंधराशे रुपये देत आहे; मात्र ते पैसे आम्हाला दोन-दोन महिने मिळत नाहीत. आम्ही काम करण्यास सक्षम नाही. आम्ही दिव्यांग आहोत. त्याच पैशांवर आमची उपजीविका, औषधपाणी चालते. आम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांसाठी फेऱ्या माराव्या लागतात; मात्र लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पेसे दिले जातात. ते पैसे जर वेळेवर वाटप केले जात असतील तर दिव्यांगांच्या आर्थिक मदतीबाबतही विलंब करू नये, अशी मागणीही सुर्वे यांनी केली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT