मार्गताम्हाणे विद्यालयात
मंगळवारी राहुटी कार्यक्रम
चिपळूण ः तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयामार्फत महोत्सव भारतीय सणांचा, सांस्कृतिक परंपरेचा हा विशेष राहुटी कार्यक्रम १० डिसेंबरला सकाळी १० वा. प्रशालेच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमातून भारतीय पारंपरिक सण व सांस्कृतिक परंपरा यांचे दर्शन सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी भारतीय सणांच्या विविध परंपरांचा आणि संस्कृतीचा रंगीत आविष्कार सादर करणार आहेत. सणांचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय व ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच एकात्मतेचा संदेश विद्यार्थी सादरीकरणातून देणार आहेत. यामध्ये गुढीपाडवा, शिमगा, दीपावली, मकर संक्रांत, वटपौर्णिमा, नवरात्र, लोहरी, कालिपूजा, ओणम, वसंत पंचमी, पोंगल, छटपूजा, रामनवमी यासारख्या सणांची रंगतदार झलक सादर करण्यात येणार आहे. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, संस्थेचे संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक लकेश्री व पर्यवेक्षक पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा कार्यक्रम होणार आहे.
शिरगावमध्ये हनुमान मंदिर
सभागृहाचे उद्घाटन
चिपळूण ः वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याकडे शिरगाव वरचीवाडी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहाची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती. यादव यांनी या मागणीची तत्काळ पूर्तता केली. हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी या सभागृहाचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते झाले. शिरगाव वरचीवाडी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सदाशिवराव शिंदे, सुधाकर शिंदे, सदाशिवराव ज्ञा. शिंदे, सुधीर शिंदे, श्रीधर शिंदे आदी उपस्थित होते.
लम्पी रोगप्रतिबंधक
लसीकरण कनकाडीत
साखरपा ः कनकाडी येथे लम्पी रोगप्रतिबंधक लसीकरण झाले. गावात या आजाराची लागण होण्यास सुरवात झाली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे मोहीम घेण्यात आली होती. त्वचारोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यामुळे सरपंच संतोष गोताड यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेटये यांच्याकडे लसीकरणाची मागणी कली होती. गावात एकूण १२ वाड्या असल्यामुळे जनावरांची संख्या जास्त आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गौरव यांनी साहाय्य केले. लसीकरणात पशुविभाग डॉ. जी. एम. दारसिंबे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. अक्षता चव्हाण, सहाय्यक आयुक्त युवराज शेटये, पशुविभागीय अधिकारी डॉ. आनंद कदम, डॉ. नाचरेकर, परिचार इंदवटकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.