कोकण

मोरोक्कोतील मच्छीमार महिलांची कथा तीच

CD

मत्स्यगंधेच्या लेकी ......लोगो
(२६ नोव्हेंबर टुडे ३)
हवामान बदलामुळे सागरी परिसंस्था आणि जीवांमध्ये बदल घडत आहेत हे जाणण्याची सूक्ष्म शक्ती या मत्स्यगंधांकडे आहे म्हणूनच हे स्रोत सुरक्षित करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करतात आणि पर्यावरण जपण्यासाठी नव्या पद्धतींचा स्वीकारही! म्हणूनच आज शेलफिश शिजवण्यासाठी जंगलातील फायरवूड न वापरता त्या आता सोलर ओव्हन वापरतात. ‘पर्यावरणाचा आदर करण्यासाठी, जपण्यासाठी आधुनिक तरीही शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे,’ हे सांगणारी फातिमा जगातल्या सगळ्याच मच्छीमार स्त्रियांचं प्रतिनिधीत्वच तर करत होती!
- rat७p१.jpg-
24N30058
- डॉ. स्वप्नजा मोहिते, रत्नागिरी
---

मोरोक्कोतील मच्छीमार
महिलांची कथा तीच

मोरोक्को... दक्षिण आफ्रिकेतील मघरेब विभागातील एक देश. इथल्या मराकेश शहराच्या नावावरून पडलेलं त्याच हे इंग्लिश नाव. मोरोक्को म्हटलं की, डोळ्यासमोर येतो इथला आफ्रिकन, अरब, बर्बर आणि युरोपियन संस्कृतींचा झालेला संगम आणि अतिशय सुंदर आणि कलापूर्ण अशा त्या मोरक्कन सिरॅमिक टाईल्स किंवा फरशा. पारंपरिक तंत्रांचा वापर करून पूर्णपणे हाताने बनवलेल्या अस्सल मोरोक्कन फरशा जगभर प्रसिद्ध आहेत. मोरोक्कोमधील फेझ किंवा मेकनेस येथून नैसर्गिक चिकनमातीपासून बनवल्या जाणाऱ्या या फरशांची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली गेली आणि जगभर या फरशा घराघरातून वापरल्या जाऊ लागल्या. मोरोक्कोला अटलांटिक महासागराचा किनारा आहे जो जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या पुढे भूमध्य समुद्रात पोहोचतो. मासेमारीबरोबरच बार्ली, गहू व इतर धान्यासोबत संत्री, टोमॅटो, द्राक्षे आणि सगळ्यात महत्वाचे ऑलिव्ह यांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
हेक, तारली, सोल, बांगडा, सी ब्रिम, गेदर, हेरिंग, ऑक्टोपस, शेवंड अशा महत्वाच्या मासळीबरोबरच इथले इतर शेलफिशही तितकेच महत्वाचे आहेत हं इथे! सार्दिन म्हणजेच तारली तर इथे पवित्रच मानली जाते. इथेही मच्छीमारी ही पुरुषप्रधानच आहे. तरीही इथल्या मच्छीमार महिला आपली रोजीरोटी कमवण्यासाठी या व्यवसायात येतात आपला जीव धोक्यात घालून! आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अंदाजे १० हजार मच्छीमार महिला उदरनिर्वाहासाठी मोरोक्कन किनारपट्टीमध्ये शेलफिश आणि इतर सीफूड गोळा करतात. शेलफिश गोळा करताना त्यांना अनेक जोखमींना तोंड द्यावे लागते आणि ते करताना त्या भविष्यातील पिढ्यांसाठी या नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यातही मदत करतात, हे विशेष.
बहुतेकदा ४५ ते ६० वयोगटातील या स्त्रिया, बादली, टोपली, चाकू आणि बूट. तसे ते त्यांच्याकडे असणं कठीणच असतं. पहाटेच्यावेळी डोंगराच्या पायथ्याकडे निघतात. इथल्या खडकाळ किनाऱ्यावर कालवं आणि इतर गोळा करण्याचे कठीण काम त्यांची वाट पाहत असतंच. २० किमीपेक्षा जास्त पसरलेल्या खडकाळ किनाऱ्यावर "येथे कालवं आणि शंखशिंपले गोळा करण्यास परवानगी आहे, अशी एक तुटकीफुटकी पाटी त्यांच्या स्वागतासाठी उभी असते. या खडकांमधून १० किमी चालायलाच त्यांना सुमारे दोन तास लागतात; परंतु आणखी थोडं पुढे गेलो तर जास्त कालवं मिळतील आणि थोडे जास्त पैसे कमावून घरी जाता येईल, या आशेनं त्या चालत राहतात पाय दुखेस्तोवर. धारदार ब्लेड आणि चाकूने आम्ही ही कालवं आणि इतर शेलफिश खरवडून काढत जातो; पण हे करताना त्या प्रजातींच्या अधिवासाचा आदर आणि संरक्षणही आम्ही करतो. फातिमा सांगत होती. एका वुमेन इन फिशरीज कॉन्फरन्समध्ये ती आपल्या देशाची प्रतिनिधी म्हणून आली होती. इथेही आता स्थानिक मच्छीमार महिलांना आधार देण्यासाठी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सहकारी संस्थेची ती उपाध्यक्ष आहे. आमच्या महिला मच्छीमारांच्या महत्वाच्या गरजा आहेत वाहतुकीची तरतूद आणि समुद्राजवळ कार्यक्षेत्र. आम्ही एकत्रितपणे काम करतो आणि इथल्या अधिवासांची काळजी घेऊनच हे शेलफिश काढतो. काही मिनिटांत माझी टोपली भरू लागते आणि तरीही आमच्या येणाऱ्या दिवसांसाठी या क्षेत्रात कालवी, शिंपले शिल्लक असतात. हे सांगताना तिच्या शब्दात तिच्या इतर सहकाऱ्यांविषयीचा आत्मविश्वास डोकावत होता.
शेलफिश गोळा केल्यानंतर ते स्वच्छ केले जातात, शिजवले जातात आणि उन्हात वाळवले जातात. रस्त्याच्या कडेला, टोपल्यांमधून हे वाळवलेले शेलफिश विक्रीसाठी ठेवले जातात. त्यांच्या उपलब्धता आणि मागणीनुसार या मच्छीमार महिला सुमारे २०० ते ३०० मोरोक्कन दिरहाम प्रतिमहिना कमावू शकतात. इथे किलोचा भाव साधारणपणे ८० दिरहामपर्यंत जातो. मे पासून जुलैपर्यंत ही कालवं व शिंपले मोठ्या प्रमाणावर मिळतात. हे शेलफिश एकाच जागी चिकटून वाढत असल्यामुळे वर्षभर त्यांची काढणी करता येते म्हणूनच या मच्छीमार महिलांसाठी हा एक विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत आहे. हे शेलफिश घरीही स्वयंपाकात वापरले जातात. त्यामुळे घरच्या जेवणाची सोय होते आणि ते विकून महिन्याच्या घरच्या खर्चाचीही चिंता काही प्रमाणात मिटते. हसतहसत फातिमा सांगत होती आणि मी तिच्या या पॉझिटिव्ह अॅटिट्यूडकडे पाहत होते. कठीण परिस्थितीत कसं जगावं, हे या मत्स्यगंधेच्या लेकी मला किती सहजतेनं शिकवत होत्या. कालावधी कितीही असो, सीफूड गोळा करणे हे अवघड आणि कष्टाचे काम आहे. रोज पाच तासांपेक्षा जास्त वेळ त्या हे काम करत असतात. या काळात त्यांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. खडक आणि शिंपल्यांच्या धारदार कवचांच्या तीक्ष्ण कडांमुळे हाता-पायांना दुखापत होते. इतकावेळ खाऱ्या पाण्यात राहिल्यानेही पाय फुटतात, त्यांना भेगा पडतात. काहीवेळेस जेव्हा भरती जास्त असते तेव्हा यांच्यापैकी काहीजणी समुद्रात ओढल्याही गेल्या आहेत; पण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आमच्या आया आणि आज्याही आमच्या नजरेसमोर हेच तर करत होत्या. फातिमाच्या नजरेत एक विषाद तरळून गेला. पुरुषप्रधान संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण करणं किती कठीण आहे, हे यांच्याशिवाय कोण जाणेल? पण तरीही तिला आपला हा व्यवसाय मनापासून आवडतो. ‘आमच्यासाठी शेलफिशशी हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले जवळचे नाते आहे. आमच्या या नात्यामुळे आमच्याकडे हा एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. यातूनच निसर्गवादाचे ज्ञान आमच्यात भिनत गेले आहे आणि त्यामुळेच पर्यावरणात होणारे बदल आम्ही टिपू शकतो. त्यानुसार आमच्या मासेमारीच्या पद्धती आम्ही बदलू शकतो.’

(लेखिका ललित लेखन करते अन् चित्रकारही आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

SCROLL FOR NEXT