30110
मळेवाड येथे आजपासून
‘सग्रह शतचंडी अनुष्ठान’
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ७ ः येथील श्री गजानन महाराज मंदिरात उद्यापासून (ता. ८) गुरुवारपर्यंत (ता. १२) सग्रह शतचंडी अनुष्ठान या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दररोज सकाळी ७.३० ते १२ या वेळेत धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे.
उद्या (ता. ८) दुपारी २ ते ५ सचिन तेली (गोवा) यांचे गायन, सायंकाळी ६ ते ७ बुवा सुदीप गावडे यांचे भजन, रात्री ९ वाजता महाआरती, सोमवारी (ता. ९) दुपारी २ ते ५ ‘सुरसंगम’ हा गायनाचा कार्यक्रम (गायक-हर्षल मेस्त्री, चिन्मय प्रभुराळकर, कौस्तुभ धुरी), ५.३० ते ६.३० बुवा रामचंद्र पालव यांचे भजन, ६.३० ते रात्री ८.१५ घुमट आरती (मडगाव), ८.१५ वाजता महाआरती, ८.३० वाजता दत्त माऊली दशावतार कंपनीचे नाटक, मंगळवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता ‘स्वरसुधा’ गायनाचा कार्यक्रम (गायक-अनघा गोगटे, शेखर पणशीकर), सायंकाळी ५.३० वाजता बुवा विनोद चव्हाण यांचे भजन, ७ वाजता हरिहर नातू यांचे कीर्तन, रात्री ९.३० वाजता महाआरती, बुधवारी (ता. ११) दुपारी २ वाजता ‘भक्तिगीत संगीत रजनी’ गायनाचा कार्यक्रम (गायक रुपेंद्र परब), सायंकाळी ५.३० वाजता गौरव पांचाळ यांचे भजन, ७ वाजता कुडाळ व कणकवली येथील महिलांचा आमने सामने फुगडीचा जंगी सामना, रात्री ९.३० वाजता महाआरती, गुरुवारी (ता. १२) दुपारी २ वाजता ‘स्वरगंध’ गायनाचा कार्यक्रम (गायक- योगेश मेस्त्री, विकास नाईक), सायंकाळी ५ वाजता हेदुलवाडी महिला मंडळ फुगडी, ६ वाजता ‘नक्षत्रांचे देणे’ गायनाचा कार्यक्रम (गायक-दशरथ नाईक, रुपाली खोत, नम्रता जोशी). ७.३० वाजता वारकरी भजन (वेंगुर्ले), रात्री ९.३० वाजता महाआरती. या धार्मिक व आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान देवस्थान समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.