30072
सिंधुदुर्ग भूमी चवीसह ऐतिहासिक वारशाने समृद्ध
डॉ. सुरेंद्र चव्हाण : मान्यवरांच्या उपस्थितीत ‘पूर्णब्रह्म पर्व’ची सांगता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ : मी कोकणातील संपन्न खाद्य संस्कृतीचा गौरव करतोच, पण त्याचबरोबर आपल्यातील विद्यार्थ्यांची सृजनशीलता, मेहनत आणि अपार कला-कौशल्य देखील अधोरेखित करीत आहे. यावर्षीच्या पर्वाची संकल्पना ‘कोस्टल मॅनिया’ ही फारच सुंदर आणि कल्पक आहे. सिंधुदुर्ग ही केवळ निसर्गरम्य भूमीच नाही तर पारंपरिक चवींनी आणि ऐतिहासिक वारशानेही समृद्ध आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ तथा रुभू बायोलॉजिक्स इंकचे सीईओ आणि संस्थापक डॉ. सुरेंद्र चव्हाण यांनी पिंगुळी येथे केले.
चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाईट सेंटर पिंगुळीच्यावतीने ‘पूर्णब्रह्म पर्व-४’ च्या सोहळ्याची सांगता शुक्रवारी (ता. ६) रात्री विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ताज ग्रुप ऑफ हॉटेल अरक्विलाचे रिसॉर्ट मॅनेजर अर्शदीप राणा, एक्झिक्युटिव्ह शेफ अश्रफ खान सेंटरचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी विवेकानंद शेट्टी, पाटकर वर्दे कॉलेजचे मुख्य शेफ डॉ. अमोल राऊळ, मुख्य शेफ व परीक्षक ए. एफ. अफसर, भूषण दुगाडे, रोशन मोहंती, क्युरी फर्नांडिस, भावेश म्हापणकर, मारिया डिसोझा, दत्तप्रसाद पवार, शेफ शशांक आमरे, प्रसन्न लाड, आदी उपस्थित होते.
डॉ. चव्हाण म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गाचा इतिहास हा हजारो वर्षांपासूनचा आहे. जिल्ह्यातील ५० ते ७० हजार वर्षांपूर्वीची रेखाटणे पाहिल्यास आपल्या देदीप्यमान इतिहासाची जाणीव होईल. भारतीय खाद्य पद्धती ही आरोग्यास हितकारक आहे व ‘ब्रह्मा’ला अनुसरून आहे. त्यामध्ये ऋतू, काळ व भौगोलिक गोष्टींचाही शास्त्रीय विचार केला आहे. आपण आपल्या खाद्य पदार्थांतून जास्तीच जास्त प्लास्टिक व रासायनिक प्रीझरव्हेटीव्हचे प्रमाण फारच कमी केले पाहिजे. वाढत्या प्रमाणातील प्लास्टिक व रासायनिक प्रीझरव्हेटीव्हचा वापरच वाढत्या रोगांचे मुख्यः कारण आहे. तसेच आपल्या परंपरागत पद्धतीनुसार जास्तीच जास्त नारळ व त्यांच्या जिन्नसांचा वापर वाढविला पाहिजे, जो आपल्या मेंदूसाठी फारच फायदेशीर आहे. अलीकडील काळात चायनीज व पाश्चिमात्य खाण्याची वाढ अतिप्रमाणात होत आहे. आरोग्य सुदृढ ठेवायचे असल्यास आपले खान-पान समतोल व स्थल व काळाला पूरक असले पाहिजे.’’ कॉलेजच्या द्वितीय वर्गाच्या विद्यार्थिनी अमृत गावडे आणि पल्लवी कोंडस्कर यांनी सूत्रसंचालन केले. पाटकर वर्दे कॉलेजचे समन्वयक अमित गावडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.