कोकण

खारेपाटण येथे उद्या जगनाडे महाराज जयंती

CD

30073

खारेपाटण येथे उद्या
जगनाडे महाराज जयंती

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : खारेपाटण येथील श्री देव कपिलेश्वर मंदिरात उद्या (ता. ८) तेली समाजाचे आराध्य दैवत तथा राष्ट्रीय संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीचे आयोजन केल्याची माहिती तेली समाज मंडळ खारेपाटणचे कार्यकर्ते रमेश जामसंडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
तेली समाज बांधव आणि खारेपाटण ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १०.०० वाजता सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, १०.३० वाजता महाआरती व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, ११.३० वाजता प्राथमिक शिक्षिका अर्चना तळगावकर व सुप्रिया झगडे यांचे ''संत जगनाडे महाराजांचा इतिहास व त्यांचे कार्य'' या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन, दुपारी १ वाजता प्रसाद वाटप व त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे. वारकरी भजन आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. खारेपाटण पंचक्रोशीतील तेली समाज ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे, आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Kerala Minister Controversy : बेडरुममध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत मंत्री, पत्नीने रंगेहात पकडताच म्हणाला- माझे ५ हजार अफेअर्स, कुणी...

Pune : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर येताना दिसली, मागच्याने उडी मारली; दुचाकी चालकाला उडवलं, एकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाही

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

SCROLL FOR NEXT