झरेबांबर अपघातप्रकरणी
टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ : दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक बसून सात वर्षांची श्रिया गवस हिच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी तिचे काका सुनील गवस यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित सुरेश पवार (वय २०, रा. तिलारीनगर, ता. चंदगड) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
गवस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी भावजय स्वरूपा ही तिची सात वर्षांची मुलगी श्रियाला सोबत घेऊन झरेबांबर येथे माहेरी जत्रोत्सवाला गेली होती. शुक्रवारी (ता. ६) त्या दोघी पुन्हा मांगेली-देऊळवाडी येथे निघाल्या. बस पकडण्यासाठी झरेबांबर तिठा येथे आली असता घाटमाथ्यावरून भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्त्यालगत उभ्या असलेल्या श्रियाला धडक दिली. रेश पुंडलिक पवार (वय २०) हा टेम्पो चालवत होता. टेम्पोचे चाक तिच्या मानेवरून व डोक्यावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, चालक पवार याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून व हयगयीने, अविचाराने भरधाव वेगात टेम्पो चालवून श्रिया हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ओतारी यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नाईक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.