कोकण

दाणोलीतील कथाकथन स्पर्धेत पूर्व सावंत प्रथम

CD

30104

दाणोलीतील कथाकथन
स्पर्धेत पूर्व सावंत प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : साटम महाराज वाचन मंदिर दाणोली व निरामय विकास केंद्र कोलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय कथाकथन स्पर्धेत पूर्व सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सानवी धुरी व रमाकांत ढवळे, तृतीय क्रमांक रेखा सावंत व तनय परब यांनी मिळविला.
उत्तेजनार्थ रविराज धुरी, सारिका नाईक, अपूर्वा सावंत, मंजिरी देऊस्कर यांना गौरविण्यात आले. साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत दाणोली परिसरातील दहा शाळा सहभागी झाल्या. प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. निरामय विकास केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यशस्वी मुलांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व ग्रंथ देऊन गौरविले. परीक्षक म्हणून वंदना करमळेकर, निकिता टिपणीस यांनी काम पाहिले. यावेळी शिक्षकांचा गुणगौरव केला. स्पर्धेत १९ विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे कार्यकारी मंडळ कृष्णाजी परब, गिरीधर चव्हाण, सुरेश आडेलकर, माधुरी चव्हाण, माडखोल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चिंतामणी मांडले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धेचेही पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रसाद बांदेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ग्रंथपाल दीपा सुकी, पवन केसरकर यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT