30130
आचरा प्रशाळेत उलगडला
साने गुरुजींचा जीवनप्रवास
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ ः साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे कवी, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजींचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरुपात सांगितला.
साने गुरुजींचे विद्यार्थी म्हणून वैशिष्ट्ये, विद्यार्थी व शिक्षक प्रसंग, स्वातंत्र्य सेनानी असताना तुरुंगवासातील प्रसंग, त्यांचे अध्यात्मिक व नैतिक विचार लिहिलेली पत्रे, वंचितासाठी केलेले कार्य याविषयी माहिती दिली. या व्याख्यानाचा लाभ अकरावी व बारावी वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यम शालेय समिती सदस्य मंदार सांबारी यांनी केले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक घुटुकडे, नाथ पै सेवांगण मालवणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, खजिनदार खंडाळेकर, प्रतिमा कुलकर्णी उपस्थित होत्या. डॉ. दतात्रय जाधव यांनी प्रास्ताविक केले. संदीप रावले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी धी आचरा पीपल्स एज्युकेशन मुंबईचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब-मिराशी व स्थानिक समिती यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.