देवगड येथे खो-खो स्पर्धेस प्रतिसाद
तालुकास्तरीय उपक्रम; दीक्षित फाउंडेशन, वाडा प्रशालेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः येथील दीक्षित फाउंडेशनचा शैक्षणिक विचार मंच व वाडा (ता. देवगड) येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, वाडा हायस्कूल स्थानिय समितीचे अध्यक्ष शांताराम पुजारे, स्थानिक समिती कार्यवाह दिनकर जोशी, शैक्षणिक विचार मंचचे कार्याध्यक्ष विकास दीक्षित, पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घस्ती, वाडा हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी, स्थानीय समिती सदस्य श्री. परब, श्री. नार्वेकर, सतीश रुमडे, महेंद्र मांजरेकर, देवगड हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, माजी पर्यवेक्षिका उल्का जोशी आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडांगण नामफलकाचे अनावरण करण्यात आले. क्रीडांगणाला ‘नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित क्रीडांगण’ असे नाव दिले. निरंजन दीक्षित यांनी, खेळाडूंनी खेळात कौशल्य दाखवावे. स्पर्धेतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून लोप पावत चाललेल्या देशी खेळांना पुन्हा एकदा उर्जितावस्था मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मैदान पूजन तसेच क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक उत्तरेश्वर लाड तसेच वाडा हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. भूषण दातार यांनी सूत्रसंचालन केले. विकास दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. हिराचंद तानवडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.