rat७p७.jpg-
२४N३००९५
राजापूर ः मार्गदर्शन करताना निलया फाउंडेशनचे प्रा. चेतन गोडबोले.
-------
खापणे महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः ग्रामीण भागातील तरुणाईला करिअरच्या सर्वाधिक संधी आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा विविध विभागातून आपण पदवीचे शिक्षण पूर्ण करतो; पण आपले नेमके ध्येय आपण ठरवत नाही. करिअरच्या सर्वाधिक संधी कॉमर्स विभागातून आहेत. त्याबाबत योग्य ती माहिती घेत विद्यार्थ्यांनी करिअरचा मार्ग निवडावा, असे आवाहन निलया फाउंडेशनचे प्रा. चेतन गोडबोले यांनी केले. तालुक्यातील रायपाटण येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि निलया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’करिअर गाईडन्स’ विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. ए. डी. पाटील होते. या वेळी निसर्गा धावडे, नेत्रा बावकर, अमेय सावंत आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.