कोकण

कोकणातील अपरिचित वैभव जगासमोर आणले पाहिजे

CD

-rat७p४.jpg-
P२४N३००६१
चिपळूण ः डीबीजे महाविद्यालयाच्या चिंचघरी येथील निवासी शिबिरात धीरज वाटेकर यांचे स्वागत करताना विद्यार्थी.
-----------
कोकणाचे वैभव जगासमोर आणले पाहिजे

धीरज वाटेकर ः चिंचघरीत डीबीजेचे निवासी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : संपूर्ण कोकण जंगलांनी, दऱ्याखोऱ्यांनी, जैवविविधतेने, सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याने समृद्ध आहे. त्यामुळे कोकणकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुपरिचित व सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांकडेच पर्यटक आकर्षिले जातात; मात्र त्या पर्यटन स्थानासोबत कोकणात अशी अनेक अपरिचित सौंदर्यस्थळे आहेत जी जगासमोर आणून समृद्ध कोकणची ओळख संपूर्ण जगाला करून देण्याची गरज आहे. त्या द्वारे संपूर्ण जग अपरिचित कोकणची सफर करेल, असे प्रतिपादन धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिंचघरी (गणेशवाडी) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात ''अपरिचित कोकणची सफर'' या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी कोकणातील पर्यटनाचा व्यावसायिकदृष्टीने अभ्यास करण्याचे व यातून करिअरच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT