30125
खर्डेकर महाविद्यालयातर्फे
एड्स निर्मूलन जागृती रॅली
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था संचालित महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अनुदानित लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पअंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले (ता. वेंगुर्ले) यांच्या सहकार्याने जागतिक एड्स निर्मूलन जनजागृती सप्ताहानिमित्त खर्डेकर कॉलेज ते सेंट लुक्स हॉस्पिटल, वेंगुर्ले मार्केट अशी जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, कोकण संस्थेचे कर्मचारी व कॉलेजचे प्राध्यापक सहभागी झाले. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अमित पाटील यांनी एड्स, टी. बी., त्याचप्रमाणे एसटीआय (गुप्तरोग) आजाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. संस्थेचे समुपदेशक समीर शिर्के यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी क्षेत्रीय कर्मचारी स्वाती मांजरेकर, प्रदीप पवार, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. आर. गावडे, डॉ. पी. एस. पाटील, प्रा. ए. बी. नरगच्चे, प्रा. डी. बी. राणे, प्रा. जे. वाय. नाईक, प्रा. व्ही. एस. चव्हाण, डॉ. जी. पी. धुरी, डॉ. एस. व्ही. परुळकर, संभाजी पाटील, एस. टी. चव्हाण आदी उपस्थित होते. संस्थेच्या स्वाती मांजरेकर आणि प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, एनएसएस विभाग यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.